पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने जो हिट अँड रन मोटार वाहन कायदा लागू करणार असल्याची चर्चा आहे. या कायद्यात वाहन अपघात झाल्यास चालक व मालकाला १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद आहे. या कायद्याने वाहन चालक मालकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात पूर्णा येथील ताडकळस-चुडावा चौफूली मार्गावर सोमवारी (दि. १५) दुपारी १२ वाजता जय संघर्ष चालक मालक वाहन संघटनेच्या वतीने शासना विरुध्द जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्यात आला. त्यामुळे अर्धा तास वाहतुक खोळंबली होती. या रास्तारोको आंदोलनादरम्यान नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे उपस्थित होते.प्रसंगी,जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळणोर,महाराष्ट्र प्रदेश सचिव राहूल पुंडगे, सुरेश बायस, संजय धस, नितीन पाटील, केरबा लोखंडे, राम कदम, गौतम बदरगे,रामेश्वर आवचार, कृष्णा शिंदे, सयद अशफाक, बाळासाहेब शिंदे,रामभाऊ रसाळ, गोवर बायस यासह बहुसंख्य वाहन चालक मालक हजर होते.