परभणी : शेतरस्ता खुला द्यावा, या मागणीसाठी शेतक-यांचे उपोषण | पुढारी

परभणी : शेतरस्ता खुला द्यावा, या मागणीसाठी शेतक-यांचे उपोषण

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरा ढोणे येथील पूर्णा-पांगरा मुख्य रोडपासून तरंगल शिवारातून जाणारा रस्ता आहे. या रस्त्याला लागून शेत असणाऱ्या शेतमालकांनी हा रस्ता खोदून येथे नाला तयार करीत हा रस्ता बंद केला आहे. हा रस्ता खुला करून द्यावा, यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी येथील बांधावर बसून आजपासून (दि.२४) उपोषण सुरू केले आहे.

या रस्त्याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी पुर्णा येथील तहसिलदारांना निवेदन दिले होते. परंतु दिड महिने होत आले तरीही याची तहसिलदारांनी घेतली नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी आत्माराम ढोणे, उत्तमराव ढोणे, देविदास ढोणे, संतोष ढोणे, भानूदास ढोणे, जळबाजी ढोणे, ज्ञानदेव ढोणे,रामदास ढोणे यांनी नाल्यानजीक शेताच्या बांधावर बसून आजपासून उपोषण सुरू केले आहे. हा रस्ता मुख्य रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस वाहतुक या रस्तावरून होते. रस्ता बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा ऊस शेतात पडून आहे. त्यामुळे या रस्ताबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button