चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला २५ लाखाची मदत | पुढारी

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला २५ लाखाची मदत

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील रामदेगी जवळील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निमढेला प्रवेशद्वारावर काम करीत असलेल्या सफाई कामगाराला वाघाने ठार केले. आज गुरूवारी (दि.२५) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. रामभाऊ रामचंद्र हनवते (वय ५२) असे या कामगाराचे नाव आहे. या कामगाराच्या कुटुंबाला वन विभागाच्या वतीने २५ लाखाची आर्थिक मदत देण्यात आली.

वनविभागातील सफाई कर्मचारी रामचंद्र हनवते हे खडसंगी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या रामदेगी निमढेला पर्यटक गेटवर सकाळी काम करीत होते. जवळच दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. ही घटना पर्यटकांच्या समोरच घडल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हनवते यांचा मुलगाही ताडोबात याच प्रवेशद्वारावर गाईड म्हणून काम करतो. या घटनेमुळे हनवते कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. आज वनविभागाच्या वतीने हनवते कुटुंबाला २५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली. त्यापैकी एक लाख रूपये नगद देण्यात आले. तर ९ लाखाचा चेक कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच १५ लाखाचे कुटूंबियांच्या नावाने डिपाझीट करण्यात येणार आहे. एकूण २५ लाखाची मदत वननिभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी धनवटे यांचे हस्ते देण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button