चंद्रपूर: आंघोळीला गेलेल्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू  | पुढारी

चंद्रपूर: आंघोळीला गेलेल्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू 

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी दोनच्या सुमारास घडली. रात्री आठ वाजता घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी जावून बालकांची शोधाशोध केली. दोन्ही मुलांचे मृतदेह आज (दि.८) सकाळी  मिळाले. गौरव विलास ठाकूर (वय १४),  शौर्य भास्कर पिंपळशेंडे (वय १५, दोघे रा. गोंडपिंपरी, शिवाजी चौक मृतांची नवे आहेत.

अशी घडली घटना :

  • उन्हाचा पारा वाढल्याने मुले तलावाकडे फिरण्यासाठी गेली होती.
  • चिमुकले पोहण्यासाठी तलावात उतरली.
  • तलावात उतरलेल्या पैकी गौरव विलास ठाकूर, शौर्य भास्कर पिंपळशेंडे हे दोघे बुडाले.
  • इतर चिमुकल्यांनी ही घटना घरी सांगितली नाही.
  • कुटुंबीयांनी तलावाकडे रात्री ८ वाजता दरम्यान धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की,  शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. कडक उन्हाची चाहूल लागली आहे.  मंगळवारी उन्हाचा पारा जास्त असल्याने  सकाळी बारा वाजता दरम्यान वार्डातीलच काही मुले न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या तलावाकडे फिरण्यासाठी गेले होते. त्या मुलांना  तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही. चिमुकले पोहण्यासाठी तलावात उतरली. तर काही मुले घरी परतले. तलावात उतरलेल्या पैकी गौरव विलास ठाकूर, शौर्य भास्कर पिंपळशेंडे हे दोघे बुडाले.
प्रत्यक्षदर्शी काही मुलासमोर ही घटना घडली. परंतु, भीतीपोटी इतर चिमुकल्यांनी ही घटना घरी सांगितली नाही. सायंकाळी घटना लक्षात आल्यानंतर बेपत्ता मुलांच्या घरच्यांनी शोधाशोध केली. त्यांना चिमुकले तलावाकडे पोहायला गेल्याचे समजले. कुटुंबीयांनी तलावाकडे रात्री ८ वाजता दरम्यान धाव घेतली. तलावाच्या बाहेर आढळलेल्या कपड्यांची ओळख पटली.

गोंडपिपरीत शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्ती गोटे, पोलिसांसह  घटनास्थळावर हजर झाले. मृतदेह शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तोपर्यंत स्थानिक मासेमाऱ्यांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. आज बुधवारी पुन्हा सकाळी शोध मोहीम राबविण्यात आली. दोन्ही मुलांचे मृतदेह पथकाच्या हाती लागले. या घटनेमुळे गोंडपिपरीत शोककळा पसरली आहे.
हेही वाचा 

Back to top button