Tractor accident : चालत्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हिंग सीटखाली दिसला साप! स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने भीषण अपघातात चालक जागीच ठार | पुढारी

Tractor accident : चालत्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हिंग सीटखाली दिसला साप! स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने भीषण अपघातात चालक जागीच ठार

धारूर, पुढारी वृत्तसेवा : सीटखाली साप पाहून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात. चालकाचा जागीच मृत्यू जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २५) सायंकाळी घडली. साडेपाच वाजण्याच्या सुमारास धारूर शहरापासून नजीक अंतरावर केज रोडवर ही घटना घडली. बळीराम रघुनाथ नाईकवाडे (वय २७ वर्षे रा. घागरवाडा) असे मयत चालकाचे नाव आहे. (Tractor accident)

धारूर तालुक्यातील घागरवाडा येथील बळीराम नाईकवाडे हे ऊसाचा ट्रॅक्टर (MH 19 AR) घेऊन येडेश्वरी कारखान्याकडे निघाले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर धारूर शहरापासून नजीक अंतरावर हजारी पेट्रोल पंपाजवळ ते पोहोचले. याचदरम्यान खुर्ची खालून साप बाहेर आल्याचे पाहून चालकाचा गोंधळून उडाला आणि स्टेरिंगवरील ताबा सुटला. या दुर्घटनेत ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला. अंगावर ट्रॅक्टर पडल्याने चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात चालक बळीराम नाईकवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी आलेल्या नागरिकांकडून सापाला ठार मारण्यात आले. अपघातामुळे ऊस रस्त्यावर पडला होता. पोलिसांनी पंचनामा करून वाहतुकीला अडथळा येत असल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. चालकाची नंतर उत्तरे तपासणी करण्यात आली. (Tractor accident)

हेही वाचा

Back to top button