Nagpur news: गडकरींचा खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव आजपासून | पुढारी

Nagpur news: गडकरींचा खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव आजपासून

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने उद्या 19 जानेवारी पासून तीन दिवसीय ‘खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. (Nagpur news)
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ता मेघे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर लगेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचा भावगीतांचा कार्यक्रम होईल. २१ जानेवारीपर्यंत होणाऱ्या या महोत्सवात दररोज पाच कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहे. तिन्ही दिवसांसाठी निःशुल्क प्रवेशिका आहे. (Nagpur news)

Nagpur news: तीन दिवस मेजवानी

१९ जानेवारी (शुक्रवार): सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचा भावगीतांचा कार्यक्रम.
२० जानेवारी (शनिवार) : कोकण कन्या बॅण्डचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’. जुनी हिंदी-मराठी गाणी नवीन पद्धतीने सादर केली जातील.
२१ जानेवारी (रविवार) : आंतरराष्ट्रीय अभिनेते शेखर सेन यांचा ‘तुलसी’ हा एकपात्री नाट्याविष्कार.

Back to top button