Corona India : देशाचा कोरोनामुक्ती दर ९८.३० टक्क्यांवर! | पुढारी

Corona India : देशाचा कोरोनामुक्ती दर ९८.३० टक्क्यांवर!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Corona India : देश हळूहळू कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रविवारी मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.३० टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला. शनिवारी दिवसभरात १२ हजार ३२९ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. तर, १० हजार ४८८ कोरोनाबाधित आढळले. दरम्यान ३१३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ३ कोटी ४५ लाख १० हजार ४१३ पर्यंत पोहचली आहे. यातील ३ कोटी ३९ लाख २२ हजार ३७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर,४ लाख ६५ हजार ६६२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात १ लाख २२ हजार ७१४ रूग्णांवर उपचार सुरू आहे.

५३२ दिवसांनी सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्या निच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आली आहे. देशात केवळ ०.३६ टक्के सक्रिय कोरोनाबाधित आहेत. रविवारी देशाचा कोरोनाचा दैनंदिन संसर्गदर ०.९८ टक्के, तर आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ०.९४ टक्के नोंदवण्यात आला.देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत लसीचे १ अब्ज १६ कोटी ५० लाख ५५ हजार २१० डोस लावण्यात आले आहे. केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना लसीचे आतापर्यंत १ अब्ज ३० कोटी ९२ लाख ५२ हजार ९५० डोस पुरवले आहेत.यातील २२ कोटी ७० लाख ९३ हजार ५३१ डोस अद्यापही केंद्र आणि राज्य सरकारकडे शिल्लक आहेत.देशात आतापर्यंत ६३ कोटी १६ लाख ४९ हजार ३७८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १० लाख ७४ हजार ९९ तपासण्या शनिवारी करण्यात आल्या.

देशातील संपूर्ण लसीकरणाची स्थिती
श्रेणी : संपूर्ण लसीकरण
१) आरोग्य कर्मचारी : ९४,००,६७४
२) फ्रंटलाईन वर्कर्स : १,६३,०६,६६६
३) १८ ते ४४ वयोगट : १०,०१,३२,५०९
४) ४५ ते ५९ वयोगट : ११,०७,०४,७३१
५) ६० वर्षांहून अधिक : ७,४०,५५,२०२

Back to top button