सातारा जिल्हा बँक निवडणूक : आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांच्या गटात हमरीतुमरी | पुढारी

सातारा जिल्हा बँक निवडणूक : आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांच्या गटात हमरीतुमरी

कुडाळ ; पुढारी वृत्‍तसेवा

जिल्हा बँक निवडणुकीच्या दिवशी मेढा येथिल मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू रुशीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. दोन्ही गटात यावेळी काही वेळासाठी राडा झाला.

यावेळी वसंतराव मानकुमरे हे आक्रमक झाले. रांजणे यांच्या पत्नी सौ अर्चना रांजणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ऋषिकांत शिंदे यांनी वसंतराव मानकुमरे व कुडाळचे प्रतापगड कारखाना संचालक मालोजीराव शिंदे यांना हातवारे करून एकमेकांना धारेवर धरले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार शिंदे व रांजणे दोघांनीही मध्यस्थी करून कार्यकर्त्यांन शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले.

सातारा जिल्हा बँक : आज हाय व्होल्टेज ड्रामा; मतदान केंद्रांवर तगडा बंदोबस्त

आज हाय व्होल्टेज ड्रामा; मतदान केंद्रांवर तगडा बंदोबस्त

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचा संघर्ष आता टोकाला पोहोचला असून रविवारी सर्व तालुक्यात घमासान होणार आहे. विशेषत: सोसायटी मतदारसंघांत थरार निर्माण झाला असून मतदार पळवापळवी झाली आहे. हे मतदार आज थेट मतदान केंद्रांवरच दाखल होणार असल्याने या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळणार आहे. बँकेच्या 10 जागांसाठी अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. मतदानासाठी सर्व केंद्रावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

सातारा जिल्हा बँकेसाठी रविवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी 11 केंद्रांवर मतदान होत आहे. सातारा जिल्हा बँकेसाठी 21 संचालकांच्या जागा असून त्यासाठी 1964 मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सातारा जिल्हा बँकेसाठी 11 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित 10 जागांसाठी आज धूमशान होणार आहे. आजच सर्व उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद होऊन तो पेटारा मंगळवारी उघडणार आहे.

कराड सोसायटी, पाटण सोसायटी, कोरेगाव सोसायटी, जावली सोसायटी, माण सोसायटी, खटाव सोसायटी, इतर मागास प्रवर्ग, नागरी सहकारी बँका व पतसंस्था व महिला प्रतिनिधी या मतदारसंघांत घमासान होत आहे. यामध्ये सर्वच सोसायटी मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

 

Back to top button