बारामतीतील दहा शेतकर्‍यांना वन विभागाकडून भरपाई | पुढारी

बारामतीतील दहा शेतकर्‍यांना वन विभागाकडून भरपाई

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात पशुधनाचा बळी गेलेल्या शेतकर्‍यांना वन विभागाने मदत केली. तालुक्यातील 10 शेतकर्‍यांच्या 25 शेळ्या, मेंढ्यांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीव गेला होता. या शेतकर्‍यांना 3 लाख 64 हजारांची भरपाई मिळाली. रविवारी (दि. 24) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शेतकर्‍यांना भरपाईचे धनादेश देण्यात आले. सन 2023 मध्ये बारामती तालुक्यात बिबट, लांडगा व अन्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात निरनिराळ्या ठिकाणी 10 शेतकर्‍यांच्या 25 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी वन विभागाने तात्काळ पंचनामा करत शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करत प्रस्ताव सादर केले होते. याप्रसंगी वन परीक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रामचंद्र ज्ञानदेव जाधव, रामदास वामन आटोळे, अनिल शिवाजी आटोळे (रा. खांडज), नितीन खंडेराव देवकाते, बबन रामचद्र नेवसे (रा. मेडद), दिलीप नामदेव तांबे (रा. तरडोली), दत्तात्रय रामभाऊ तावरे (रा. मोरगाव) विजय साधू टकले (रा. कानाडवाडी), धनाजी भास्कर भगत, बाळासो विठ्ठल सस्ते (रा. उंडवडी सुपे) अशी भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

हेही वाचा

Back to top button