Twitter Server Down | जगभरात X डाऊन; ट्विट्स दिसेनात, नेमके काय झाले? यूजर्संच्या तक्रारी | पुढारी

Twitter Server Down | जगभरात X डाऊन; ट्विट्स दिसेनात, नेमके काय झाले? यूजर्संच्या तक्रारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या जवळपास २० ते ३० मिनिटांपासून सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म  एक्स X (पूर्वीचे ट्विटर) डाऊन झाले आहे. एक्सचा सर्व्हर डाऊन झाल्याने युजर्समधील अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. अनेक युजर्स ‘Downdetector’ डाऊनडिटेक्टरवर प्रश्न विचारत आहेत. मात्र ट्विटरमध्ये हा तांत्रिक बिघाड का झाला आहेत, या संदर्भात अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. (Twitter Server Down )

मायक्रोब्लॉगिंग साइट ‘X’ वर (पूर्वीचे ट्विटर) गुरुवारी (दि.२१) सकाळी 11 च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. वेबसाईट आणि मोबाईल ऍप्लिकेशनवर X अकाऊंट सुरू केल्यानंतर ट्विट्स ऐवजी (पोस्ट) ‘तुमच्या टाइमलाइनवर आपले स्वागत आहे’ असे दाखवत आहे. यावरून असे दिसते की, प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात आउटेजचा सामना करावा लागत आहे तसेच युजर्ससाठी X चा वापर करणे शक्य होत नसल्याचे अनेक युजर्संनी डाऊनडिटेक्टरला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. (Twitter Server Down)

X/Twitter down?
X/Twitter down?

Twitter Down: Downdetector अहवालानुसार ‘एक्स’ अनेकवेळा डाऊन

एक्सला आउटेजचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. एलोन मस्कच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मला या वर्षी मार्च आणि जुलैमध्ये डाउनटाइमचा सामना करावा लागला. जुलैमध्ये, Downdetector ने अहवाल दिला आहे की, यूएस आणि यूकेमध्ये 13,000 पेक्षा जास्त वेळा X डाऊन झाले आहे. दरम्यान युजर्संनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे ट्विटर पूर्णपणे काम करत नाही?,  ‘X’ तुटलं आहे का? मी कोणत्याही टिप्पण्या पाहू शकत नाही किंवा कोणतेही प्रोफाइल पाहू शकत नाही. आणखी कोणाला हे जाणवत आहे?,  माझे एक्स का काम करत नाही? असे प्रश्न विचारले आहेत.  (Twitter Server Down)

X/Twitter down?
X/Twitter down?

हेही वाचा:

Back to top button