Twitterची चिमणी उडाली भुर्रर…! नावही बदललं! एलन मस्क यांची मोठी घोषणा | पुढारी

Twitterची चिमणी उडाली भुर्रर...! नावही बदललं! एलन मस्क यांची मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन : एलन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा आयकॉनिक ब्लू बर्ड लोगो काढून टाकणार असल्याची घोषणा रविवारी केली होती. त्यानुसार मस्क यांनी ट्विटरच्या होमपेजवर एक नवीन लिंक पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी ट्विटरचा ब्लू बर्डचा लोगो बदलून X केला आहे. त्याच्या एका ताज्या ट्विटमध्ये, मस्क यांनी ‘अंतरिम X लोगो आज लाइव्ह केला आहे.

तसेच Twitter आता X म्हणून ओळखले जाईल. Twitter चे डोमेन देखील Twitter.com वरून X.com झाले आहे. तुम्ही x.com ला भेट दिल्यास ते तुम्हाला twitter.com वर रीडायरेक्ट करेल. एलन मस्क यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे.

एलन मस्क यांनी ट्विट करत म्हटले आहे की, X.com आतापासून ट्विटरला रीडायरेक्ट करेल. याचाच अर्थ यूजर्स X.com URL टाकल्यानंतर ट्विटर साइटवर जाऊ शकतील. आता X.com टाकल्यानंतर ट्विटर साइट उघडत आहे आणि हा ट्विटरचा एक मोठा बदल आहे. एलन मस्क यांनी रविवारी सांगितले होते की ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो X ने बदलण्यासाठी त्याला लोकांच्या सूचनांची गरज आहे आणि त्याला योग्य लोगो मिळताच बर्ड लोगो बदलला जाईल.

एलन मस्क यांनी त्याच्या ट्विटर बायोमध्ये नवीन लिंकदेखील शेअर केली आहे. ट्विटरच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी रविवारी घोषणा केल्यानंतर त्यांचे पहिले ट्विटदेखील शेअर केले आहे. लिंडा याकारिनो यांनी म्हटले आहे की, “X ही भविष्यातील अमर्याद संवादासाठी आहे. हे ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग, पेमेंट्स/बँकिंग आदीमध्ये केंद्रीत आहे. हे कल्पना, वस्तू, सेवा आणि संधींसाठी जागतिक बाजारपेठ निर्माण करते. AI द्वारे समर्थित X आम्हा सर्वांना अशा प्रकारे जोडेल ज्याची आम्ही कल्पना करू लागलो आहोत.”

मे महिन्यात उघड झाले होते की ट्विटर आधीच X.corp नावाच्या कंपनी अंतर्गत नोंदणीकृत आहे. Twitter च्या लोगोबद्दल सांगायचे झाल्यास सध्या यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या ट्विटर अॅपवर फक्त त्यांना ब्लू बर्ड लोगो दिसत आहे. त्यात अद्याप बदल झालेली दिसत नाही.

 हे ही वाचा :

Back to top button