Twitter Vs Meta : ‘Threads App’ वरून ट्विटर-मेटामध्ये जुंपली; एलन मस्क यांचा कारवाईचा इशारा

Twitter Vs Meta
Twitter Vs Meta

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटाने ट्विवटला ठक्कर देणारे थ्रेड्स अ‍ॅप (Threads App) नुकतेच लॉन्च केले आहे. मेटाच्या या इन्स्टा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममुळे Twitter आणि Meta मध्ये जुंपली आहे. ट्विटरशी प्रतिस्पर्धा करत, मेटाने त्यांच्या थ्रेड्स अ‍ॅपपमध्ये सारखेच फीचर्स आणल्यामुळे ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Twitter Vs Meta) संतापले आहेत. त्यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

ट्विटरचे वकील अ‍ॅलेक्स स्पिरो यांच्या माध्यमातून गुरूवारी (दि.६ जून) फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्ग यांना नोटीस पाठवल्याचे एका अहवालात म्हटले आहे. या पत्रामध्ये ट्विटरने आपल्या बौद्धिक संपत्ती अधिकार कायम ठेवणे आणि त्यांची कठोर अंमलबजावणीचा मानस असल्याचे म्हटले आहे. तसेच मेटाने ट्विटरची व्यापार रहस्य आणि इतर गोपनीय माहिती वारणे बंद करण्यासाठी पावले उचलावित, अन्यथा बौद्धिक संपत्ती अधिकार कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ट्विटरने मेटाचे सीईओ झुकेरबर्ग (Twitter Vs Meta) यांना दिला आहे.

Twitter Vs Meta : मेटाकडून प्रतिक्रिया नाही

मेटा ने बुधवारी (दि.५ जून) मेटा थ्रेड्स अ‍ॅप लॉन्च केले. कारण सोशल मीडिया फर्म इंस्टाग्रामच्या अब्जावधी यूजर्संचा फायदा घेऊन एलन मस्क यांचे ट्विटर ताब्यात घेण्याच्या विचारात आहे. मेटा आणि स्पिरो यांनी यावर अद्याप टिप्पणी केलेली नाही.

थ्रेड्स अ‍ॅप ठरू शकते 'ट्विटर-किलर'

Twitter प्रमाणेच Meta च्या अ‍ॅपमध्ये लहान मजकूर पोस्ट करता येऊ शकतो. ज्याला युजर्स लाईक करू शकतात, तो पुन्हा पोस्ट करू शकता. हे अ‍ॅप अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअर आणि गुगलच्या प्ले स्टोअरवर १०० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. ट्विटरसारखेच या अ‍ॅपचे फिचर असल्याने थ्रेड्स अ‍ॅप 'ट्विटर-किलर' ठरू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news