COVID-19 : ‘घाबरू नका, सतर्क रहा’; कोरोनाच्‍या नव्‍या व्हेरियंटबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन | पुढारी

COVID-19 : 'घाबरू नका, सतर्क रहा'; कोरोनाच्‍या नव्‍या व्हेरियंटबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना विषाणू नवा सब व्हेरियंट (COVID-19) JN.1 मुळे पुन्‍हा एकदा जगभरातील चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेने (WHO) या सब व्‍हेरियंटचा समावेश ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ यादीत केला आहे. यापार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. सर्व राज्यांना केंद्राकडून सर्व सहकार्य केले जाईल. घाबरून जाण्याची गरज नाही तर आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, असे आवाहन मंत्री मांडविया यांनी बैठकीत केले.

“संपूर्ण सरकार दृष्टिकोनासह सर्वांनी एकत्र काम करण्याची ही वेळ आहे. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. हॉस्पिटलची तयारी, वाढलेली देखरेख आणि लोकांशी प्रभावी संवाद याच्या मॉक ड्रिलसह तयार राहणे महत्त्वाचे आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये दर ३ महिन्यांनी एकदा मॉक ड्रिल केले जावे. राज्यांना केंद्राकडून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देतो. आरोग्य राजकारणाचे क्षेत्र नाही,” असे मांडविया यांनी या बैठकीत सांगितले. (COVID-19)

कोरोनाच्‍या नव्‍या व्हेरियंटबाबत WHO ची मोठी अपडेट

कोरोना विषाणू नवा सब व्हेरियंट ( विषाणूचे उत्परिवर्तन) JN.1 मुळे पुन्‍हा एकदा जगभरातील चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेने (WHO) या सब व्‍हेरियंटचा समावेश ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ यादीत केला आहे. यामुळे आता या कोरोना विषाणूमध्‍ये झालेल्‍या उत्‍परिवर्तनाचे स्‍वतंत्रपणे वर्गीकरण करण्‍यात आले आहे. यासंदर्भात WHO ने एक निवेदनही जारी केले आहे. ( JN1 variant)

WHO ने आपल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, कोरोना नवीन ‘JN.1’ या सब व्हेरियंटचा समावेश ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ यादीत करण्‍यात आला आहे. ‘JN.1’ पूर्वी त्‍याच्‍या मूळ वंशाच्‍या BA.2.86 एक प्रकार म्‍हणून वर्गीकृत करण्‍यात आला होता. मात्र आता थंडीच्‍या दिवसांमध्‍ये नव्‍या व्‍हेरियंटचा संसर्ग पसरण्‍याचा धोका निर्माण झाला आहे. त्‍यामुळे आता त्याचे स्वतंत्रपणे वर्गीकरण करण्यात आले आहे. ( WHO Classifies JN1 as variant of interest )

‘ JN1 variant’ वर सध्‍याची लस प्रभावी

‘डब्ल्यूएचओ’ स्‍पष्‍ट केले आहे की, “कोरोनाच्‍या नव्‍या व्‍हेरियंटचा नागरिकांना मोठा धोका नाही. कारण आतापर्यंत आढळलेल्‍या रुग्‍णाची परिस्थिती पाहता, JN.1 आरोग्यासाठी धोकादायक नाही. सध्याची लस त्यात प्रभावी आहे आणि रुग्णांना त्याच्या धोक्यापासून वाचवते.”

WHO कडून ॲडव्हायजरी जारी

कोरोनाच्‍या नवीन व्‍हेरियंटवर जागतिक आरोग संघटनेने (WHO) अॅडव्हायजरी जारी केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. कोविड पॉझिटिव्ह रूग्णांवर फक्त PPE किट घालून उपचार करा आणि व्हेंटिलेटर सुविधा सुरळीत चालू ठेवाव्‍यातलोकांनी गर्दीच्या, बंद किंवा खराब हवेच्या ठिकाणी मास्क घालावे. तसेच, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे त्‍यामध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button