MLA Hiraman Khoskar : पितृशोक असतानाही आमदार खोसकर सदनात | पुढारी

MLA Hiraman Khoskar : पितृशोक असतानाही आमदार खोसकर सदनात

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- वडीलांचे निधन होऊन दहा दिवस उलटत नाही, तोच आमदार हिरामण खोसकर यांनी नागपुर गाठले आणि अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील महत्वाच्या विषयांवर सहभाग घेतला. यावेळी सदनामध्ये त्र्यंबकेश्वर-इगतपुरी या मतदारसंघातील अनेक विषयांबाबत लक्षवेधी मांडली. विधानसभेतील विविध पक्षातील आमदारांनी आ. खोसकर यांचे वडीलांच्या निधनाबद्दल सांत्वनही केले.

आमदार खोसकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीमध्ये वैतरणा धरणातील अतिरिक्त शेतजमीनी शेतकऱ्यांना परत देण्यास जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाच्यावतीने मुळ शेतकऱ्यांचे नावे जमीन हस्तांतरित करून ७/१२ उतारा नावे होण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. तसेच तीन वर्षांपुर्वी अवकाळी पावसाने भात, वरई, नागली पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. विमा कंपनीला याबाबत ७२ तासांचे आत पिक नुकसानीची माहिती देणे बंधनकारक होते. मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची पुर्वकल्पना व पुरेशी माहिती नसल्याने शेतकरी विमा लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांसाठी असलेली ७२ तासांची वेळ वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासींचे स्थलांतर थांबविण्यासाठी वळण बंधारे योजनांना मंजुरी मिळावी. या भागातील आदिवासींचे स्थलांतर थांबविण्यासाठी सिंचनासाठी व पशुपालणासाठी पाणी उपलब्ध करून देणे हा एकमेव पर्याय आहे. सिंचन सुविधा झाल्यास आदिवासींचे स्थलांतर थांबेल व त्यांचे जीवनमान सुधारुन त्यांना समाजाचे प्रमुख प्रवाहात आणणेसाठी मदत होईल. अशा स्वरुपाच्या लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.

मतदारसंघात चर्चा

अधिवेशन सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आ. खोसकर यांचे वडील कै. भिकाजी खोसकर (८५) यांचे ८५ निधन झाले होते. अंत्यसंस्कार तसेच दशक्रिया विधी आटोपून आमदार खोसकर लगोलग नागपुर येथे अधिवेशनासाठी हजर झाल्याने मतदारसंघात चर्चेचा विषय आहे.

हेही वाचा :

Back to top button