कोल्हापुरात 20 एम.एल.डी. सांडपाणी वाढणार | पुढारी

कोल्हापुरात 20 एम.एल.डी. सांडपाणी वाढणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सध्या पंचगंगा नदीतून चार ठिकाणांवरून होणारा पाणी उपसा व नव्याने काळम्मावाडी थेट पाईपलाईनने सुरू असलेला पाणीपुरवठा यामुळे शहरात 20 एम. एल. डी. पेक्षा जास्त सांडपाणी वाढणार असून एकूण 60 एम.एल.डी. सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळणार आहे.

थेट पाईपलाईनने जो पाणीपुरवठा केला जातो, त्याचा तीन ते चार महिन्यांचा चाचणी कालावधी, असे म्हटले जात आहे. यावरून थेट पाईपलाईनचे पाणी हे शहरात येणार आहेच. त्याशिवाय चार ठिकाणी असलेल्या पाणी उपसा केंद्रांतूनही पाणीपुरवठा होणार आहे. एकूण 290 ते 300 एम.एल.डी. पाणी कोल्हापूर शहरात येणार आहे.

यामुळे पूर्वीच्या सांडपाण्यात नव्याने निर्माण होणारे 20 एम.एल.डी. पाणी वाढणार आहे. एकूण 60 एम.एल.डी. सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळणार असल्याने नदीतील पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पाईपलाईनला लागणारी गळती आणि घरगुती वापराचे पाणी यामुळे 40 एम.एल.डी. सांडपाणी होते. आता त्यात थेट पाईपलाईनने शहराला पाणीपुरवठा होऊ लागला आहे. त्याचा अतिरिक्त साठा होऊ शकतो.

यातील 20 एम.एल.डी. पाणी वाढणार आहे. एकूण 60 एम.एल.डी. सांडपाणी होणार आहे. दरम्यान, शहरात वाढणारे सांडपाणी लक्षात घेऊन या सांडपाण्याचा निपटारा करण्यासाठी 4 एम.एल.डी. व 6 एम.एल.डी. प्रकल्प तत्काळ सुरू करा, घनकचर्‍याचे व्यवस्थापन करा, यासह इतर कारणांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. 15 दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत; अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशाराही नोटिसीत दिला आहे.

यावरून भविष्यात कोल्हापूर शहरातील नाल्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस पाठवून सूचित केले आहे. हे सांडपाणी दुधाळी आणि जयंती नाल्यातून थेट पंचगंगेत मिसळत आहे. सध्या त्याचे प्रमाण कमी आहे आणि ते 20 एम.एल.डी.पेक्षा जास्त वाढू शकते.

सांडपाणी शुद्धीकरणासाठी शहरात चार प्रकल्प

सांडपाणी शुद्धीकरणासाठी शहरात चारच ठिकाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून केवळ 98 एम.एल.डी. पाण्यावर प्रक्रिया होते. प्रत्यक्षात दीडपट पाणी वाहून नदीत मिसळते. त्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही. या पाण्यामुळे पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची दक्षता घेऊन प्रदूषण मंडळाने इशारा दिला आहे.

Back to top button