Cop28 dubai : हवामान बदलासंदर्भात आजपासून दुबईत COP-28 परिषद | पुढारी

Cop28 dubai : हवामान बदलासंदर्भात आजपासून दुबईत COP-28 परिषद

पुढारी ऑनलाईन डेस्क: यंदाची २८ वी हवामान बदल शिखर परिषद आजपासून (दि.३०) दुबई येथे सुरू होत आहे. या परिषदेमध्‍ये जगभरातील हवामान बदलाच्या परिणामांवर चर्चा होणार आहे. आफ्रिकेतीस हॉर्न ऑफ येथील प्राणघातक महापूर, उन्हाळ्यात कॅनड्यातील जंगलाला लागलेला वणवा, मानवी इतिहासातील जागतिक तापमानवाढ नोंद या मुख्य विषयांवर कॉप-२८ (COP-28) परिषदेत चर्चा होणार आहे. (Cop28 dubai)

Cop28 dubai: जागतिक हवामान बदलासंदर्भातील ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

संयुक्त राष्ट्राच्या कॉप परिषदेत हवामान संदर्भातील अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संवादामध्ये हवामान बदलाचे दुष्परिणाम, जीवाश्म इंधनाचा वापर, मिथेन आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आर्थिक मदत आणि देण्यात येणारी भरपाई या मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. (Cop28 dubai)

जगभरातील २०० देशांचे नेते होणार सहभागी

प्राणघातक उष्णता, दुष्काळ, जंगलातील आग, वादळ आणि पूर यांचा जगभरातील जीवनमान आणि जीवनावर परिणाम होत आहे. या मुद्यांवर संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषदेत चर्चा होणार आहे. २०२१-२२ मध्ये जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यातील ९० टक्के जीवाश्म इंधनामुळे झाले होते. कॉप-२८ (COP-28) दरम्यान याविषयावरही चर्चा होणार आहे. जगभरातील राजा चार्ल्स तिसरा, पोप फ्रान्सिस आणि जवळपास 200 देशांचे नेते या मुद्द्यांवर ठळकपणे लक्ष देणार आहेत. १ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारताकडून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. (Cop28 dubai)

पंतप्रधान मोदींचा COP परिषदांमध्ये पुढाकार

गेल्या काही वर्षांत, आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि भू-राजकीय घडामोडींमध्ये भारताने आपल्या वाढत्या दबदबाच्या अनुषंगाने वार्षिक हवामान बदल परिषदेतही (COP) आपला पुढाकार वाढवला आहे. हरितगृह वायूंचा तिसरा सर्वात मोठा उत्सर्जक म्हणून, वार्षिक COP कार्यक्रमांमध्ये भारत विकसनशील देशांसाठी एक प्रभावशाली आवाज म्हणून उदयास येत आहे. 2021 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या COP 26 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पर्यावरणासाठी जीवनशैली – LIFE’ हा पर्यावरणाबाबत जागरूक जीवनशैली कार्यक्रम अंगीकारण्याचा जागतिक उपक्रम पुढे केला. जगभरातील देशांनी तो स्वीकारलाही होता.

हेही वाचा:

 

Back to top button