Chhagan Bhujbal : …तर जरांगे यांच्यावरील टीका थांबविणार | पुढारी

Chhagan Bhujbal : ...तर जरांगे यांच्यावरील टीका थांबविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे-पाटील यांनी दोन महिन्यांत 14 सभा घेतल्या. त्यात अनेक वेळा माझ्याविरोधात चुकीचे उद्गार काढले. यावर माझी काहीही प्रतिक्रिया नव्हती. मात्र, त्यानंतर माझी अंबडला एकच सभा झाली. त्यामध्ये मी तिथे भाषण केले, त्यामुळे त्यांनी आपल्यावरील वैयक्तिक टीका थांबवली तर आपणही टीका थांबवू अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्यात भुजबळ- जरांगे वाद पेटला असून भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास विरोध कायम असल्याचे सांगतानाच सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर आरक्षण देणे योग्य नाही, तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका असल्याचे म्हटले आहे.

मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal)  म्हणाले की, आपण जे काही बोललो येवल्यात बसून नाही तर अंबडला जाऊन बोललो. भुजबळाचं नाव घेऊन अश्लील एसएमएस आणि शिव्या घातल्या गेल्या. त्यामुळे विरोध करणे गरजेचा होता. एवढ्या दिवसांत मी कुणबीविरोधात कुठेही बोललो नाही, त्यांच्यावर कोणताही अन्याय होता कामा नये, अशीच आपली भूमिका आहे. मराठा आरक्षण वेगळं द्या, याला कोणाचाच विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचा मंत्री आणि एक नेता म्हणून आम्हाला पेटवापेटवी नको आहे. आमच्याकडून काही जाळलं गेलं नाही. सुरुवात ज्यांनी केली त्यांनी बोलावं त्यासोबतच भुजबळ यांनी आपण जरांगे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण संपर्क झाला नाही. माझ्या कोणत्या भूमिकेला जरांगेचं समर्थन नाही हे मला जाणून घ्यायचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. (Chhagan Bhujbal)

लढा सुरूच राहणार…

एकटा तर एकटा पण लढा सुरूच राहणार आहे. ओबीसीचं काम करीत राहणार आहे. याला कितपत यश मिळेल ते माहीत नाही. या लढ्यात जे नवीन-जुने सोबत येतील त्यांना सोबत ओबीसींचा लढा कायम सुरू ठेवू, असेही भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा ;

Back to top button