पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकानंतर आता लगेच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या टी २० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रेयस अय्यर रायपूर आणि बेंगळुरू येथे खेळवण्यात येणाऱ्या दोन टी २० सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून संघात सामील होईल.
टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी अर्थात 2024 मध्ये खेळवली जाणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेची तयारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेपासून सुरू करेल. ही मालिका 23 नोव्हेंबरपासून भारतात खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रममध्ये तर तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाईल. यानंतर चौथा टी-20 सामना 1 डिसेंबरला नागपुरात तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल.
भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार