वाघोलीत प्रेमीयुगुलाने लॉजवर उचललं टोकाचं पाऊल | पुढारी

वाघोलीत प्रेमीयुगुलाने लॉजवर उचललं टोकाचं पाऊल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाघोलीतील एका लाॅजमध्ये प्रेमीयुगुलाने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान या घटनेमागचं निश्चित कारण समजू शकलं नाही. सचिन गोकुळ शिंदे (वय ३०), कोमल सुनील बरके (वय २०, दोघे रा. खराडी, नगर रस्ता) अशी जीवन संपवाल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, यामागचे कारण अध्याप समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सचिन आणि कोमल सोमवारी संध्याकाळी नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात असलेल्या नानाश्री हाॅटेलमध्ये आले होते. दोघांनी जीवन संपवल्याची घटना रात्री उघडकीस आली. या घटनेची माहिती हाॅटेलमधील व्यवस्थापकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत सचिन आणि कोमल यांचे प्रेमप्रकरण सुरू होते.

प्रेमप्रकरणाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती. दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं, यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी सापडली नाही. ससून रुग्णालयात मंगळवारी सकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले आहेत. पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.

हेही वाचा

पुण्यात पुन्हा खळबळ! वाघोलीत प्रेमीयुगुलाने लॉजवर उचललं टोकाचं पाऊल

Maratha Reservation Protest | मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात २४ मिनिटे चर्चा

स्क्विडच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

Back to top button