

टोकियो : समुद्रांच्या अथांग दुनियेत अनेक प्रजाती वावरत असतात. आता संशोधकांनी स्क्विड या जलचराच्या दोन नव्या प्रजाती शोधल्या आहेत. त्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्णच आहे. इजपानच्या समुद्र किनार्यावरील कोरल रीफजवळ आठ हात असलेल्या आश्चर्यकारक समुद्री प्राण्याची ही एक नवीन प्रजाती आढळून आली. ही प्रजाती शिकार पकडण्यासाठी मार्शल आर्टससारखे तंत्र वापरत असल्याचं दिसून आले. जेव्हा शास्त्रज्ञांचे लक्ष या प्राण्याकडे गेले तेव्हा त्यांच्या तपासणीत हे समोर आले की ही एक नवीन प्रजाती आहे.
'मरीन बायोलॉजी' जर्नलमध्ये 21 ऑक्टोबर रोजी या प्राण्याविषयीचा एक अभ्यास प्रकाशित झाला होता. त्यानुसार, ब्रॅंडन रायन हॅनन यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा याचा शोध लावला होता. युक्यू बेटांवर पाण्याखाली छायाचित्रे काढताना त्यांना एक लहान स्क्विड दिसला ज्याच्या छायाचित्रांनी संशोधकांना आश्चर्यचकीत करून सोडलं. या अभ्यासाचे सहलेखक जेफ्री जॉली यांनी 24 ऑक्टोबर रोजी ओकिनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीला सांगितले की, हा लहान स्क्विड शोधणे सोपे नाही. अभ्यासात असे म्हटले आहे की, छायाचित्रकारांच्या मदतीने संशोधकांनी 27 लहान स्क्विड गोळा केले आणि त्यांना मत्स्यालयात ठेवले.
त्याने समुद्रातील या प्राण्यांचे विश्लेषण केले आणि त्यांना कळालं की त्यांना दोन नवीन प्रजाती सापडल्या आहेत. संशोधकांनी सांगितले की, पहिल्या नवीन प्रजातीचे नाव कोडमा जुजुत्सू किंवा हन्नानचे पिग्मी स्क्विड होते. त्याचे शरीर गोलाकार आहे, ज्याची लांबी सुमारे 0.5 इंच असू शकते. त्याच्या एका टोकाला टोक असते. त्याला 8 हात, सकर्स आणि दोन टेंटॅकल्स आहेत. त्याचे शरीर सोनेरी, पिवळे किंवा केशरी रंगाचे असते. त्यावर गडद केशरी आणि तपकिरी डाग देखील असतात. तर त्याचे डोळे चांदीचे असल्यासारखे दिसतात, तर बाजूला ते निळे-हिरवे दिसतात. संशोधकांनी सांगितले की त्यांनी नवीन प्रजातीचे नाव जुजुत्सू तिच्या शिकार पद्धतीवर आधारित ठेवले आहे. सापडलेल्या दुसर्या नवीन प्रजातीला इडिओसेपियस किजिमुना किंवा युक्यू पिग्मी स्क्विड असे नाव देण्यात आले आहे.