शत्रूंचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करणार, इस्रायलप्रमाणे भारतही बनवणार ‘Iron Dome’ | पुढारी

शत्रूंचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करणार, इस्रायलप्रमाणे भारतही बनवणार 'Iron Dome'

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आगामी वर्षांमध्ये २०२८-२९ पर्यंत लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षणासाठी विशेष प्रणाली विकसित करत आहे. यासाठी भारत इस्रायलप्रमाणे देशी आयर्न डोम उभारणार आहे. या आयर्न डोमद्वारे भारत शत्रूंचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करु शकणार आहे. ही संरक्षण यंत्रणा 350 कि.मी. पेक्षा जास्त अंतरावरून येणारी स्टेल्थ फायटर, विमाने, ड्रोन, क्रूझ मिसाईल आणि शस्त्रे शोधून नष्ट करण्यात सक्षम असणार आहे. (Iron Dome)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रकल्प कुशा अंतर्गत, DRDO स्वदेशी लांब पल्ल्याचा पृष्ठभाग-टू-एअर क्षेपणास्त्र (LM-SAM) प्रणाली विकसित करत आहे. आयर्न डोम हा प्रकल्प इंटरसेप्शन क्षमतेशी संबंधित आहे. अलीकडेच समाविष्ट केलेल्या रशियन S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणालीसारखीच ही संरक्षण यंत्रणा असणार आहे. (Iron Dome)

हवाई संरक्षण यंत्रणा विशेष असेल (Iron Dome)

सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने मे 2022 मध्ये LR-SAM प्रणालीला “मिशन-मोड” प्रकल्प म्हणून विकसित करण्यास मान्यता दिली होती. यानंतर संरक्षण मंत्रालयाने गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलासाठी ५०० कोटी रुपये खर्चून पाच स्क्वाड्रन्स खरेदी करण्याची घोषणा केली. 21,700 कोटी रुपये यासाठी मंजूर करण्यात आले होते. लांब पल्ल्याच्या मोबाइल LR-SAM मध्ये 350 कि.मी. पर्यंतच्या रेंजमध्ये शत्रूंना गुंतवून ठेवण्यासाठी ही इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे असतील.

DRDO कडून काय सांगण्यात आले? (Iron Dome)

DRDO च्या मते, धोरणात्मक आणि संवेदनशील क्षेत्रांना व्यापक हवाई संरक्षण कवच प्रदान करणे हे या प्रणालीचे उद्दिष्टे आहे. LR-SAM कमी-रडार क्रॉस-सेक्शनसह उच्च-गती लक्ष्यांवर देखील प्रभावी होईल. हे AWACS (एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम) आणि 350 किलोमीटरच्या रेंजमध्ये मध्य-हवेत मोठ्या विमानांना इंटरसेप्शनसह 250 किलोमीटरच्या श्रेणीतील शत्रूंच्या हवाई हल्ले रोखण्यात यशस्वी ठरेल. (Iron Dome)

हेही वाचलंत का?

Back to top button