World Cup 2023 : विश्वचषकात अफगाणिस्तानने मिळवला तिसरा विजय; इंग्लंड, पाक नंतर लंकेचा उडवला धुव्वा | पुढारी

World Cup 2023 : विश्वचषकात अफगाणिस्तानने मिळवला तिसरा विजय; इंग्लंड, पाक नंतर लंकेचा उडवला धुव्वा

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक 2023 च्या 30 व्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभव केला आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २४१ धावा करत अफगाणिस्तान समोर २४२ धावांचे आव्हान ठेवले होते. लंकेचे आव्हान अफगाणिस्तानने तीन गडी गमावन गाठले.  अजमतुल्ला उमरझाईच्या नाबाद ७३ धावा आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या नाबाद ५८ धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने हा विजय मिळवला. विश्वचषकात अफगाणिस्तानने तिसरा विजय मिळवला. इंग्लंड, पाक नंतर लंकेचा धुव्वा उडवत अफगाणिस्तानने विश्वचषकातील तिसरा उलटफेर केला आहे. या पराभवामुळे श्रीलंकेचा पुढचा मार्ग कठीण झाला आहे.

तत्पूर्वी, पाथुम निसांका याच्‍या ४६ (चेंडू ६०), कुसल मेंडिसच्‍या ३९ ( चेंडू ५०), सदिरा समरविक्रमा याच्‍या ३६ (चेंड्र ४०) धावा आणि आठव्‍या विकेटसाठी अँजेलो मॅथ्यूज आणि महेश तिक्ष्णा यांनी केलेल्‍या महत्त्‍वपूर्ण ४५ धावांच्‍या भागीदाराच्‍या जोरावर श्रीलंकेने २४१ धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्‍तानसमोर विजयासाठी २४२ धावांचे लक्ष्‍य ठेवले आहे. अफगाणिस्‍तानच्‍या  फजलहक फारुकी ४, मुजीब उर रहमान २, रहमानउल्ला गुरबाज आणि रशीद खान यांनी प्रत्‍येकी १ विकेट घेतली.

श्रीलंकेची सावध सुरुवात, निसांकाच्‍या ४६ धावा

श्रीलंकेला पहिला धक्का सहाव्या षटकांत २२ धावांवर बसला. फजलहक फारुकी याने दिमुथ करुणारत्नेला पायचीत (एलबीडब्ल्यू)  केले. त्याने २१ चेंडूत १५ धावा केल्या. १९ व्‍या षटकात श्रीलंकेला दुसरा धक्‍का बसला. निसांका याला अजमतुल्ला उमरझाई याने गुरबाजकरवी झेलबाद केले. निसांका याने ४ चौकारांच्‍या सहाय्‍याने ६० चेंडूत ४६ धावा केल्‍या. श्रीलंकेने २२ षटकांमध्‍ये १०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला.

अफगाणी गाेलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेचा डाव गडगडला

श्रीलंकेला २८ व्‍या षटकात तिसरा झटका बसला. मुजीबने कुसल मेंडिसला नजीबुल्‍लाकरवी झेलबाद केले. मेंडिसने तीन चौकाराच्‍या मदतीने ५० चेंडूत ३९ धावा केल्‍या. यानंतर ३० व्‍या षटकात मुजीबने समरविक्रमा याला पायचीत (एलबीडब्ल्यू) केले. समरविक्रमा याने ४० चेंडूत ३६ धावा केल्‍या. ३२ षटकांमध्‍ये श्रीलंकेने ४ गडी गमावत १५०  धावांचा टप्‍पा ओलांडला.

हेही वाचलंत का?

Back to top button