Onion News : चाळीसगाव बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी 5327 रुपयांचा भाव | पुढारी

Onion News : चाळीसगाव बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी 5327 रुपयांचा भाव

जळगाव : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला विक्रमी पाच हजारांहुन अधिक भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळी पूर्व आनंद बघाण्यास मिळाला. शेतकऱ्याला 5327 रुपयांचा भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असे चित्र दिसू लागले आहे.

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारी एक मुख्य बाजारपेठ आहे. यामध्ये भुसार व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याचप्रमाणे शनिवारी भरणारा येथील गुरांचा बाजार उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे कांदा या शेतीमालाचे लिलावही येथे मोठ्या प्रमाणात होत असतात. चाळीसगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते. परंतु सध्या आवक कमी असली तरी बाजारभाव मात्र चांगल्या प्रमाणावर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता नवीन कांद्याचे उत्पादन मात्र अत्यल्प आहे. नवीन लाल कांदा मात्र बाजार समितीमध्ये अजून उपलब्ध झालेला नाही. असलेल्या जुना कांदा हा शेतीमाल मोठ्या प्रमाणावर खराब झाल्यामुळे कांद्याचे उत्पन्न अत्यल्प होते. परंतु तरीही शेतकरी बांधवांनी ठेवलेला कांदा हा शेतीमाल खराब होत असल्यामुळे ते बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहेत.

तिरपोळे येथील शेतकरी नरेंद्र राजपूत यांच्या कांदा या शेतीमालाला सर्वाधिक 5327 रुपये भाव मिळाला. दत्त ट्रेडिंग कंपनी यांनी हा माल खरेदी केला. 27 ऑक्टोबर रोजी चाळीसगाव बाजार समितीमध्ये 83 वाहनांमधून कांदा या शेतीमालाची आवक झाली होती. कमीत कमी 1700 रुपयांपासून तर 5327 रुपये पर्यंत कांदा शेतीमाल पुकारला गेला.

यावेळी बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक भाऊसाहेब सोनवणे, व्यापारी अनिल चौधरी, नितीन चौधरी, स्वप्निल पाटील, देशमुख मामा, प्रकाश चौधरी, विकी चौधरी, पिंटू चौधरी, महेंद्र गोंधळी, रुपेश चौधरी, शिपाई अरुण शिरसाठ, सुरक्षा रक्षक दिलीप देवरे, मापाडी तसेच शेतकरी बांधव हे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

तरी वाढत्या बाजार भावाचा फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल चाळीसगाव बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, सचिव जगदिश लोधे व नूतन संचालक मंडळ यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button