जळगाव : सिंकदराबादकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीतून २ लाख ६२ हजारांचा गांजा जप्त | पुढारी

जळगाव : सिंकदराबादकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीतून २ लाख ६२ हजारांचा गांजा जप्त

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या  निवडणुकांचे पाच राज्यांमध्ये वारे वाहू लागलेले आहेत. यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने भुसावळ विभागातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये सर्च अभियान सुरू केलेले आहेत. या अभियानांतर्गतच गुरुवारी (दि.२७)  रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वानपथकाने  विशाखापट्टणम-सिकंदराबाद विशेष गाडीमधून दोन लाख 62 हजार रुपयांचा 26 किलो गांजा जप्त केला आहे.

 विशाखापट्टण सिकंदराबाद विशेष गाडीमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजय पाटील व जितेंद्र इंगळे शिवान वीरू सोबत अकोला ते भुसावळ आपले कर्तव्य बजावीत असताना आचेगाव रेल्वे स्टेशनवर गाडी सुटल्यानंतर एस नाईन कोच मध्ये बाथरूम जवळ श्वान पथक विरुला दोन संदिप्त पोतड्या आढळून आल्या.

याबाबत लागलीच रेल्वे सुरक्षा विभागाच्या सुरक्षा नियंत्रण कक्षाला भुसावळ निरीक्षक आर के विना यांच्याकडून माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर गाडी आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर केमिना उपनिरीक्षक के आर तर्ड यांनी कोचमध्ये जाऊन संशयित ताब्यात घेऊन त्याची पाहणी केली. यावेळी एका कोतडीमध्ये सफेद रंगाच्या सात बंडल, दुसऱ्या गोणीमध्ये सहा बंडल, खाकी कलरचे टेपचे आवरणात मिळून आले.

असे १३ बंडल मिळून आल्यानंतर नायब तहसीलदार शोभा घुले यांच्या समक्ष त्यांचे वजन करण्यात आले. त्यामधून आंबट उग्र वास व बीज असलेल्या ओला गांजा मिळून आला. पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. सदरील कारवाई मंडल सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव सहाय्यक सुरक्षा आयुक्त अशोक कुमार निरीक्षक राधाकिशन मीना उपनिरीक्षक के आर तर्ड यांनी केलेली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button