Asian Para Games 2023 : दिलीप गावितची ‘सुवर्ण’ धाव; पुरुषांच्या ४०० मी-टी ४७ स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक | पुढारी

Asian Para Games 2023 : दिलीप गावितची 'सुवर्ण' धाव; पुरुषांच्या ४०० मी-टी ४७ स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताकडून पदकांची लयलूट सुरूच आहे. आज शनिवारी स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने पहिले सुवर्ण जिंकत नवा इतिहास रचला आहे. दिलीप महादू गावित याने पुरुषांच्या ४०० मी-टी ४७ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ४९.४८ सेकंद वेळेत त्याने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. या पदकासह भारताने या स्पर्धेत पदकांची शंभरी पार केली आहे. (Asian Para Games 2023)

संबंधित बातम्या : 

शुक्रवारी नितीश कुमार आणि तरुण या भारतीय जोडीने पुरुष दुहेरी SL3-SL4 बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले. तसेच सुहास यथीराजने बॅडमिंटन एकेरी SL-4 मध्ये सुवर्णपदक जिंकले. भारताला बॅडमिंटन एकेरी SL-3 स्पर्धेत दोन पदके मिळाली. प्रमोद भगतने सुवर्णपदक तर नितेश कुमारने रौप्यपदक पटकावले. महिला एकेरीच्या SU-5 प्रकारात तुलसीमती मुरुगेसनने चीनच्या क्विशिया योगाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या 1500 मीटर टी-38 शर्यतीत रमण शर्माला सुवर्णपदक तर देवेंद्र कुमारला डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदक मिळाले. राकेश कुमारने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. पुरुष दुहेरीच्या एसयू-5 सामन्यात चिराग बरेथा आणि राजकुमार यांना इंडोनेशियाकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. लक्ष्मीने डिस्कस थ्रो F37/38 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भालाफेकमध्ये प्रदीप कुमारने रौप्य आणि अभिषेक चमोलीने कांस्यपदक जिंकले.

स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पदके जिंकणारे भारतीय खेळाडू

सुवर्ण : देवेंद्र कुमारने पुरुषांच्या F64 डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : रमण शर्माने पुरुषांच्या T38 1500 मध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : शीतल देवीने महिलांच्या कंपाउंड तिरंदाजी ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकले
सुवर्ण : प्रमोद भगतने पुरुष एकेरी SL3 मध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : तुलसीमाथी मुरुगेसनने महिला एकेरी SU5 बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले
सुवर्ण : सुहास यथीराजने पुरुष एकेरी SL 4 बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : नितेश कुमार-तरुणने पुरुष दुहेरी SL3-SL4 बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : सोलैराज धर्मराजने पुरुषांच्या T64 लांब उडीत सुवर्णपदक जिंकले.
रौप्य : चिराग बरेथा-राजकुमार यांनी पुरुष दुहेरी SU5 मध्ये रौप्यपदक जिंकले
रौप्य : परदीप कुमारने पुरुषांच्या F64 डिस्कस थ्रोमध्ये रौप्यपदक जिंकले
रौप्य : प्रदीप कुमारने पुरुषांच्या F-54 भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकले
रौप्य : कृष्णा नगरला पुरुष एकेरी SH6 मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले
रौप्य : राकेश कुमारने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये रौप्यपदक जिंकले
रौप्य : मानसी जोशी-तुलासिमाथी सुंदरेसन यांनी महिला दुहेरी SL3-SU5 चकमकीमध्ये रौप्यपदक जिंकले.
कांस्य : सौरवने पुरुषांच्या F64 डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : अभिषेक चमोलीने पुरुषांच्या F-54 भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : लक्ष्मीने महिलांच्या F37/38 डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : नितेश कुमारने पुरुष एकेरी SL3 मध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : मनूने पुरुषांच्या F37 शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : सुयश जाधवने पुरुषांच्या S7 50 मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक जिंकले.

हेही वाचा : 

Back to top button