gujarat garba heart attack news : गुजरातमध्ये गरबा खेळताना मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

gujarat garba heart attack news : गुजरातमध्ये गरबा खेळताना मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमध्ये गरबा (gujarat garba) खेळत असताना एका १७ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत नवरात्रीच्या उत्सवादरम्यान गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (gujarat garba heart attack news)

संबंधित बातम्या : 

खेडा जिल्ह्यातील कपडवंज शहरात गरबा खेळत असताना १७ वर्षीय वीर शाहला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (gujarat garba heart attack news)

गेल्या २४ तासांत १० जणांचा मृत्यू (gujarat garba heart attack news)

गेल्या २४ तासांत गुजरातमधील गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने १० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये १७ वर्षीय तरूणाचा देखील समावेश आहे. २४ तासांत ५०० हून अधिक रुग्णवाहिकांना कॉल करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने अलर्ट जारी केला आहे. गरबा कार्यक्रमांच्या आयोजकांनी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याच्याही सुचना दिल्या आहेत.

गुजरातमध्ये गरबा खेळण्याचे प्रमाण फार जास्त आहे. मात्र, यंदाच्या वर्षी गुजरातमध्ये गरबा खेळल्याने अनेकांना जीव गमावावा लागला आहे. गेल्या २४ तासांत गरबा खेळताना किमान १० जणांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले लोक किशोरवयीन ते मध्यमवयीन आहेत. यामध्ये १३ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. बडोद्याच्या दाभोई येथील १३ वर्षीय मुलाचा देखील गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये शुक्रवारी (दि.२१) एक २४ वर्षीय तरुण गरबा खेळत असताना कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. शिवाय, कपडवंज येथेही १७ मुलाचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या व्यतिरिक्त, नवरात्रोत्सवा दरम्यान, आपत्कालीन रुग्णवाहिकेला (१०८) ह्रदयाशी संबंधित समस्यांसाठी ५२१ कॉल आले होते. हे कॉल्स संध्याकाळी ६ ते पहाटे २ च्या दरम्यान रेकॉर्ड केले गेले, जेव्हा गरबा खेळला जातो. राज्य सरकारने गरबा खेळण्यात येत असलेल्या ठिकाणांजवळील सरकारी रुग्णालयांना आणि आरोग्य केंद्रांना अलर्ट जारी केला आहे. तसेच यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गरबा आयोजकांना देखील आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्रमात त्वरीत प्रवेश करण्यासाठी रुग्णवाहिकांसाठी कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (gujarat garba heart attack news)

हेही वाचा : 

 

Back to top button