Garba Events in Gujarat : गरबा खेळताना ह्रदयविकाराचे झटके; २४ तासांत १० जणांचा मृत्यू | पुढारी

Garba Events in Gujarat : गरबा खेळताना ह्रदयविकाराचे झटके; २४ तासांत १० जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षी नवरात्रोत्सवात सर्वत्र गरबा खेळला जातो. गुजरातमध्ये गरबा खेळण्याचे प्रमाण फार जास्त आहे. मात्र, यंदाच्या वर्षी गुजरातमध्ये गरबा खेळल्याने अनेकांना जीव गमावावा लागला आहे. गेल्या २४ तासांत गरबा खेळताना किमान १० जणांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले लोक किशोरवयीन ते मध्यमवयीन आहेत. यामध्ये १३ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. बडोद्याच्या दाभोई येथील १३ वर्षीय मुलाचा देखील गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. (Garba Events in Gujarat)

अहमदाबादमध्ये शुक्रवारी (दि.२१) एक २४ वर्षीय तरुण गरबा खेळत असताना कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. शिवाय, कपडवंज येथेही १७ मुलाचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या व्यतिरिक्त, नवरात्रोत्सवा दरम्यान, आपत्कालीन रुग्णवाहिकेला (१०८) ह्रदयाशी संबंधित समस्यांसाठी ५२१ कॉल आले होते. हे कॉल्स संध्याकाळी ६ ते पहाटे २ च्या दरम्यान रेकॉर्ड केले गेले, जेव्हा गरबा खेळला जातो. (Garba Events in Gujarat)

राज्य सरकारने गरबा खेळण्यात येत असलेल्या ठिकाणांजवळील सरकारी रुग्णालयांना आणि आरोग्य केंद्रांना अलर्ट जारी केला आहे. तसेच यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गरबा आयोजकांना देखील आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्रमात त्वरीत प्रवेश करण्यासाठी रुग्णवाहिकांसाठी कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Garba Events in Gujarat)

हेही वाचंलत का?

Back to top button