Fake Heart Attack : बिल भरणे टाळण्यासाठी २० हॉटेल्समध्ये घेतलं हार्ट अटॅक आल्याचं सोंग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 Fake Heart Attack
Fake Heart Attack

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉटेलचे बिल भरणे टाळण्यासाठी एका व्यक्तीने २० ठिकाणी हार्ट अटॅक आल्याचे सोंग घेतल्याचा प्रकार स्पेनमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने २० हॉटेल्समध्ये ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सोंग घेत बिल चुकवण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतांश हॉटेल्स हे स्पेनच्या कोस्टा ब्लँका या प्रदेशातील आहेत. (Fake Heart Attack)

बिल भरणे टाळण्यासाठी संबंधित ५० वर्षीय व्यक्ती नाट्यमय रित्या हार्ट अटॅक आल्याचा बनाव करत होता. हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यानंतर तो छाती घट्टपणे पकडायचा. त्यानंतर जमीनीवर पडत भोवळ आल्याचे सोंग घेत होता. एका हॉटेल मालकाला या व्यक्तीचे सोंग समजले. त्यानंतर त्याने इतर स्थानिक हॉटेल्समध्ये या व्यक्तीचे फोटो दिले आणि त्याच्या सोंगाला बळी पडू नका, असे सांगितले. (Fake Heart Attack)

गेल्या महिन्यात या ५० वर्षीय व्यक्तीने एल ब्युएन कोमर, एलिकॅन्टे येथील हॉटेलमध्ये प्रवेश केला. काही ऑर्डर दिल्या. व्हिस्कीचाही आनंद घेतला. मात्र, जेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी 34.85 युरो ($37) चे बिल आणले. तेव्हा त्याने टेबल सोडून उठून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर वेटरने त्याला बिल भरायचे असल्याचे बजावले. तेव्हा हा घोटाळेबाज म्हणाला की, हॉटेलच्या रुममधून पैसे आणणार आहे. परंतु वेटरने त्याला जाऊ दिले नाही. याच क्षणी त्याने हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव सुरू केला. दरम्यान, या हॉटेलचे कर्मचारी त्याच्या सोंगाला बळी पडले नाहीत. त्यांनी रुग्णवाहिकेऐवजी पोलिसांना कळवले. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा वैद्यकीय मदत मागू लागला. मात्र, त्याला माहिती नव्हते की, पोलिसांनी त्याला ओळखले आहे. (Fake Heart Attack)

स्पॅनिश मीडियाच्या मते, ५० वर्षीय माणूस आधीच कोस्टा ब्लँकामधील रेस्टॉरंट मालकांमध्ये कुप्रसिद्ध आहे. तो 2022 च्या नोव्हेंबरमध्ये एलिकॅन्टेमध्ये प्रथम दिसला आणि तेव्हापासून त्याच्या हृदयविकाराच्या दिनचर्यासाठी प्रसिद्ध झाला. तो बहुतेक वेळा बिल न भरता पळून जातो, परंतु पोलिसांचा सहभाग असल्यास त्याला त्रास होईल असे वाटत नाही. जेव्हा तो त्यांना पाहतो तेव्हा तो नेहमी हसतो. कदाचित कारण त्याला माहित आहे की, ते त्याला रोखण्यासाठी काही करू शकत नाहीत. घोटाळा करण्याचा दिनक्रम पुन्हा सुरू करण्यापूर्वी एक किंवा दोन रात्र तुरुंगात घालवायला हरकत नाही, अशी त्याची भावना आहे. (Fake Heart Attack)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news