अमेरिकेचे परराष्‍ट्र मंत्री सौदीत ‘वेटिंग’वर!, जाणून घ्‍या प्रकरण? | पुढारी

अमेरिकेचे परराष्‍ट्र मंत्री सौदीत 'वेटिंग'वर!, जाणून घ्‍या प्रकरण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास युद्धाचा भडका उडल्‍याने जगाचे टेन्‍शन वाढलं आहे. मागील दहा दिवसांच्‍या संघर्षामध्‍ये इस्रायलमधील मृतांची संख्या ३,८०० हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्‍यान, याप्रश्‍नी सौदी अरेबियात चर्चा करण्‍यासाठी गेलेले अमेरिकेचे परराष्‍ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांना सौदीचे क्राऊन प्रिन्स ( Saudi Crown Prince)  मोहम्मद बिन सलमान यांनी वेटिंगवर ठेवले. त्‍यांना तासन् तास वाट पाहण्यास भाग पाडले. अखेरी त्‍यांना दुसर्‍या दिवशी भेट दिली, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे.

नेमकं काय घडलं ?

युद्धाच्या तीव्रतेबद्दल भिन्न मते असूनही, ब्लिंकेन यांनी पत्रकारांना सांगितले की, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी त्यांची चर्चा अत्यंत फलदायी होती,असेही या वृत्तात म्‍हटले आहे. तर सौदी राज्य वृत्तसंस्था, ‘एसपीए’ने दिेल्‍या माहिनसार, सा, नुसार, बैठकीत, सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी संघर्ष थांबवण्यासाठी आणि गाझावरील इस्रायली नाकेबंदी उठवण्यावर चर्चा झाली. क्राउन प्रिन्स मोहम्मद यांनी ब्लिंकेट यांना दोन्‍ही देशांमधील संघर्ष कमी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी रियाधच्या सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांबद्दल देखील सांगितले. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यासह प्रादेशिक नेत्यांशी संवाद समाविष्ट आहे. पॅलेस्टिनींना त्यांचे कायदेशीर हक्क प्राप्त करण्यासाठी आणि न्याय्य आणि चिरस्थायी शांतता मिळवण्याची गरज सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमा यांनीन अधोरेखित केली.

गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये हमासच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीनंतर अँटनी ब्लिंकन प्रादेशिक दौऱ्यावर आहेत. ब्लिंकेन यांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचीही भेट घेतली आहे. आम्ही UN, इजिप्त, इस्रायल, इतरांसोबत, मदत मिळवण्यासाठी आणि ज्यांना त्याची गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा तयार करत आहोत,” असेही ब्लिंकेन म्हणाले.

Back to top button