वाशिम : अडीच एकरातील सोयाबीनला आग, सव्वा लाखांचे नुकसान | पुढारी

वाशिम : अडीच एकरातील सोयाबीनला आग, सव्वा लाखांचे नुकसान

वाशिम – वाशीम येथील शेतकरी वैभव बंडु माळेकर, रवि माळेकर आणि विमलबाई माळेकर यांच्या मालकीच्या घोडबाभुळ येथील शेतातील आगीमुळे सोयाबीन बेचिराख झाले आहे. गट नं. २७ (१) मध्ये असलेल्या अडीच एकर शेतातील सोयाबीनच्या गंजीला रविवार, १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञातांनी आग लावली. या आगीत शेतकर्‍याचे अंदाजे २५ पोत्यांचे सोयाबीन जळून खाक झाले. या आगीत शेतकर्‍याचे जवळपास सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या – 

रवि माळेकर यांनी सोमवारी, १६ ऑक्टोबरला घटनेची फिर्याद शहर पोलीस स्टेशनला दिली. दुपारी १२ वाजता पोलीसांनी तलाठी पटुकले यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन फिर्याद दाखल केली आहे. मोठ्या परिश्रमाने उगवलेले सोयाबीन जळून खाक झाल्याने माळेकर परिवार चिंतातुर झाला आहे. या घटनेची चौकशी करुन आरोपींना अटक करण्यासह सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी माळेकर यांनी केली आहे.

Back to top button