Ananya Panday : अनन्याची पहिली ‘कॉल मी बे’ वेबसीरीज ४ महिन्यानंतर ओटीटीवर

Ananya Panday : अनन्याची पहिली ‘कॉल मी बे’ वेबसीरीज ४ महिन्यानंतर ओटीटीवर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'स्टुडंट ऑफ द ईअर २' या चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आता बेवसीरीजकडे वळली आहे. अनन्याचा आगामी 'कॉल मी बे' ही वेबसीरीज लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या वेबसीरीजची आधीच घोषणा करण्यात आली होती. आता याची रिलीज डेट समोर आली आहे.'कॉल मी बे' ही वेबसीरीज ४ महिन्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

अनन्या पांडेविषयी 'हेही' वाचा

  • अनन्या पांडेची पहिली नवी वेबसीरीज येत आहे.
  • या वेबसीरीजचे नाव 'कॉल मी बे' असे आहे.
  • 'कॉल मी बे' ही वेबसीरीज ४ महिन्यांनी म्हणजे, ६ सप्टेबरला रिलीज होत आहे.

नुकतेच अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या इन्स्टाग्रामवर 'कॉल मी बे' ही वेबसीरीजमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनन्या रेड रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये एका सुटकेसवर बसलेली दिसत आहे. यासोबत तिच्या हातात एक छोटी रेड कलरची पर्स असून ती या वेशभूषेत खूपच ग्लॅमरस दिसतेय. मोकळ्या केसांची स्टाईल, मोठे इअररिग्स, हाय हिल्स, मेकअप आमि लिपस्टिकने लूक पूर्ण केलाय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनन्याने लिहिलं आहे की, "'हे बे! तुमचे कॅलेंडर अपडेट करा, गोष्टी बदलणार आहेत. ६ सप्टेंबर. #CallMeBaeOnPrime'." यावरून अनन्याचा आगामी वेबसीरीज ४ महिन्यानंतर म्हणजे, ६ सप्टेंबर २०२४ रोजी चाहत्याच्या भेटीस येत असल्याची माहिती मिळतेय. 'स्टुडंट ऑफ द ईअर २' या चित्रपटाच्या यशानंतर अनन्याने वेबसीरीजकडे आपला मोर्चा वळविल्याचे समजते. यात श्रीमंत आणि गरीब यातील कथा दाखवण्यात येणार आहे.

'कॉल मी बे' वेबसीरीज 'हे' आहेत कलाकार

वेबसीरीज 'कॉल मी बे' चे दिग्दर्शन कॉलिन डी कुन्हा यांनी केलं आहे. अनन्या पांडे या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्यासोबत वीर दास, गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, विहान सामत, मुस्कान जाफरी, निहारिका लिरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथूर हे देखील कलाकार यात आहेत.

'कॉल मी बे' वेबसीरीजची कथा

'कॉल मी बे' वेबसीरीजमध्ये अनन्या पांडे बेले चौधरीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे. कथा बेलेच्या अवती-भोवती फिरणारी आहे. अप्रामाणिक मार्गाने श्रीमंत झाल्यानंतर, तिला कळले की, तिची सर्वात मौल्यवान संपत्ती नसून तिचा स्मार्टनेस आहे. यानंतर ती पुर्ण खचते. पण, आपली हार मानत नाही. असे दाखविण्यात आलं आहे.

'या' चित्रपटांमध्ये अनन्या दिसणार

'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अनन्या पांडे शेवटची 'खो गये हम कहाँ' चित्रपटामध्ये दिसली होती. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात 'अहाना सिंह'ची तिने भूमिका साकारली. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यानंतर अनन्या 'नियंत्रण' मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे 'शंकरा' हा देखील चित्रपट आहे. याशिवाय 'बॅड न्यूज' मध्येही तिचा कॅमिओ रोल आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news