नवाब मलिक ‘वन टू वन’ चर्चा करा; मोहित कांबोज यांचे आव्हान | पुढारी

नवाब मलिक 'वन टू वन’ चर्चा करा; मोहित कांबोज यांचे आव्हान

मुंबई, पुढारी ऑनलाईन

नवाब मलिक यांनी केवळ माध्यामांतून आरोप करण्यापेक्षा आता समोरासमोर येऊन ‘वन टू वन’ चर्चा करा, असे आव्हान भाजपचा नेता मोहित कांबोज याने दिले आहे. मलिक यांनी ड्रग्ज प्रकरण हे मोहित कांबोज याने खंडणी उकळण्यासाठी रचलेले षडयंत्र होते, असा गंभीर आरोप केला होता. तसेच या प्रकरणातील एक संशयित हा कांबोज याचा मेहुणा असल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर कांबोज याने मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

कांबोज ते फडणवीस

मलिक यांनी कांबोज यांनी ट्विट करून मलिक यांना थेट आव्हान दिले आहे. समीर वानखेडे यांच्यापासून सुरू झालेली मलिक यांची आरोपांची मालिका थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत येऊन थांबली आहे. काल मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे थेट गुन्हेगारांशी कसे संबंध आहेत याबाबत आरोप केले होते. तसेच फडणवीस यांनी मलिक यांच्या जावयाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी नोटीस पाठविली आहे. मलिक हे दररोज पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींवर आरोप करत असल्याने पक्षात अस्वस्थता आहे. त्यामुळे मोहित कांबोज यांनी मलिक यांना समोरासमोर येण्याचे आव्हान दिले आहे.

  ‘चर्चेला कुठेही या’

मोहित कंबोज ट्विटमध्ये म्हणता की, ‘नवाब मलिकजी माझ्यासोबत कुठल्याही राष्ट्रीय चॅनेलवर वादविवाद करा. वेळ, ठिकाण तुम्ही ठरवा.’
नबाव मलिक यांनी पुन्हा एकदा मोहित कंबोज यांना लक्ष्य केले होते. या प्रकरणातील अनेक साक्षीदार समोर आले. त्यांनी हे रॅकेट कसे काम करते याचे खुलासे केल्यानंतर कांबोज यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. ड्रग्स प्रकरणामध्ये आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण झाले होते, असा आरोप केला. मात्र मोहित यांनी हे आरोप फेटाळून लावले.

हेही वाचा : 

 

Back to top button