१३ वर्षांनी लहान प्रियकरासोबत पळाली कोट्यधीशाची बायको

१३ वर्षांनी लहान प्रियकरासोबत पळाली कोट्यधीशाची बायको
Published on
Updated on

(प्रियकरासोबत पळाली बायको) मध्य प्रदेशमधील इंदौर येथील एक ४७ वर्षीय महिला तिच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान प्रियकरासह घरातून तब्बल ४७ लाख आणि सोने घेऊन पसार झाली. मात्र, महिन्याभरात विविध ठिकाणी फिरून पैसे संपल्यावर ती घरी परतली. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात आपण पतीच्या घरी राहणार असल्याचे सांगितले. अखेर पतीनेही तिला घरी राहण्यास परवानगी दिली. ही महिला मध्य प्रदेशातून फरार होऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरली. तिचा प्रियकर रिक्षाचालक अद्याप पसार आहे.

१३ ऑक्टोबर रोजी खजराना परिसरातील एका प्रॉपर्टी ब्रोकरची पत्नी तिच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या रिक्षाचालकासोबत पळून गेली होती. जाताना तिने घरातून ४७ लाख रुपये आणि सोने घेऊन गेली. तिचा पती कोट्याधीश असला तरी त्यांचे फारसे एकमेकांशी पटत नव्हते. त्यात तिचे सूत रिक्षाचालकाशी जुळले. त्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा एकमेकांसोबत राहण्याचा मनसुबा काही फळाला आला नाही.( प्रियकरासोबत पळाली बायको )

संबधित महिलने घरातून नेलेले ४७ लाख रुपये तिने प्रियकराला दिले. त्याने ते आपल्या रितेश ठाकूर आणि फुरकान यांना ३४ लाख रुपये दिले. हे पैसे पोलिसांनी आधीच जप्त केले. पोलिसांनी संबधित महिलेचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापा मारला. मात्र, ते दोघेही हाती लागले नव्हते. अखेर सोमवारी रात्री उशिरा संबधित महिला पोलिस ठाण्यात हजर झाली.

प्रियकरासोबत पळाली बायको : प्रियकर अद्याप पसार

तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या कारमधून संबधित महिला प्रियकरासोबत पीथमपूर येथे पोहोचले. त्यानंतर हे दोघे जावरा, शिर्डी, लोणावळा, खंडाळा, नाशिकमध्ये राहिले. त्यानंतर ते गुजरातमधील बडोदा आणि सूरतला गेले. मात्र, तोपर्यंत त्यांच्याकडील पैसे संपत आले होते. त्यानंतर त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. संबधित महिला एकटीच पोलिस ठाण्यात हजर झाली. परत येताना तिने सोबत नेलेले सोने परत आणले. मात्र, पैसे खर्च झाल्याने तिने सांगितले. तिचा प्रियकर अद्याप पसार आहे.

तिचा प्रियकर तेरा वर्षांनी लहान असूनही ती प्रेमात पडली. पती वारंवार छळ करतो त्यामुळे मी त्याच्यासोबत पळून गेले असा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. मी घरातून पळाले. मात्र आता पतीसोबत राहू इच्छिते असे महिलेने सांगितले. पतीनेही त्यास संमती दिली आहे. (प्रियकर अद्याप पसार )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news