विराट कोहली याच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा अटकेत | पुढारी

विराट कोहली याच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा अटकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याच्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. २३ वर्षाच्या रामनागेश अलिबेथिनी याला महाराष्ट्र पोलिसांनी हैदराबाद मधून अटक केली आहे. त्याला गुरुवारी मुंबई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याने धमकी दिल्यानंतर आपले ट्विटर हॅन्डल बदलले होते. आणि स्वत: पाकिस्तानी असल्याचे भासवणार होता. पोलिसांनी ट्विटच्या आधारे त्या तरुणाची चौकशी केली होती.

विराट कोहलीच्या मुलीला धमकीच्या प्रकरणावर दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस दिली होती. ज्या पध्दतीने ९ महिन्याच्या मुलीला धमकी दिली गेली ते “खूप लाजिरवाणे” आहे. अस ट्विटमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलं होते. अटक केलेला तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो बेरोजगार आहे. यापूर्वी त्याने फूड डिलिव्हरी अॅपसाठी काम केले आहे. असे पोलिसांनी सांगितलं आहे.

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानकडून झालेल्या दारूण पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीला ट्रोलचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर सोशल मीडियावर गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्याला जातीवरुन ट्रोल केले होते., तेव्हा विराट कोहलीने ट्रोलरांना धुडकावून लावलं होतं.

यावेळी नेटकऱ्यांनी विराटच्या परिवाराला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. विराट कोहलीच्या ९ महिन्याच्या मुलीविषयी अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. हे समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर विराट कोहलीला पाठिंबा दिला होता. वाईट पध्दतीने ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अनेकांनी केली होती.

हेही वाचलत का?

…आणि या गावाच नाव अपशिंगे मिलिटरी पडलं

Back to top button