Pune News : पाझर तलावाच्या भिंतीवर बिनधास्तपणे फिरतोय बिबट्या
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील संतवाडी आळे परिसरात बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे,पाझर तलावाच्या भिंतीवर बिनधास्तपणे विहार करणारा बिबट्या स्थानिकांना पहायला मिळाला. मानवी वस्तीत फिरणारा बिबट्या हा निर्भीड आहेच शिवाय जुनाच रहिवासी असल्यासारखा वावरताना दिसतो. बिबट्यांची वाढलेली संख्या यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनानी पावलं उचलावीत असं म्हंटलं जातय पण कृती मात्र घडताना दिसत नाही,पण वस्तीतील लोक असुरक्षीत तर आहेतच त्यांना या संकटातून सोडविण्याकरीता कोणी राज्यकर्ते झटताना दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे.बिबट सफारी पेक्षा असे मानवी वस्तीत वावरणारे बिबटे पहाणं हीच बिबट सफारी सध्या लक्षवेधी ठरत आहे.
हेही वाचा :