दादा-साहेब एकत्र या..! बैलांवर रंगविलेल्या संदेशाने वेधले लक्ष | पुढारी

दादा-साहेब एकत्र या..! बैलांवर रंगविलेल्या संदेशाने वेधले लक्ष

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा :  ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा भाद्रपदी बैलपोळा फुरसुंगी, उरुळी देवाची, वडकी परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बैलांवर रंगविलेल्या ‘दादा-साहेब एकत्र या…’ व ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ या ओळींनी लक्ष वेधून घेतले. परिसरातील गावांमध्ये पोळ्यानिमित्त पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या तालावर सजविलेल्या बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. बैलांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

मात्र, भेकराईनगर येथील ढोरे परिवाराची बैलजोडी मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरली. या बैलांना आकर्षकपणे सजवून त्यांच्या पाठीवर ‘दादा-साहेब एकत्र या’व ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’, या ओळींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या ‘मराठा आरक्षण’ हा ज्वलंत विषय असून, बैलपोळ्याच्या माध्यमातून या विषयावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्याचे शेतकरी कैलास ढोरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button