Global postage week : पोस्टमन झाले आणखी ‘स्मार्ट’; सायकलवरून आता ‘ई-बाईक’कडे प्रवास | पुढारी

Global postage week : पोस्टमन झाले आणखी ‘स्मार्ट’; सायकलवरून आता ‘ई-बाईक’कडे प्रवास

शिवाजी शिंदे

पुणे : एकेकाळी टपाल कार्यालय म्हटले की, जुनाट, मळकट, तुटलेल्या खुर्च्या, टेबल, अस्वच्छता असे चित्र सरार्र्स दिसत असायचे. त्यातच नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसायची. परिणामी, नागरिक आपले टपाल अगर पार्सल पाठविण्यासाठी खासगी कुरिअर कंपन्याकडे वळाले होते. मात्र, काळच्या ओघात टपाल विभागाने वेगाने बदल करण्याचा चंग बांधला आणि गेल्या काही वर्षात आधुनिकीकरणाची कास धरून केलेल्या बदलामुळे सद्यस्थितीत शहरी तसेच ग्रामीण भागातील कार्यालये म्हणजे कॉर्पोरेट कंपन्याच्या कार्यालयांना लाजवतील, अशी करण्यात आली आहेत. त्यामुळे टपाल विभागाकडे नागरिकांचा ओढ वाढला असल्याचे दिसून येत आहे.

त्यातच गेल्या काही वर्षापासून टपाल खात्यात कार्यरत असलेले ‘पोस्टमन’ यांच्या हातात अत्याधुनिक यंत्रणा दिली आहे. परिणामी, तेही आता ‘स्मार्ट आणि टेक्नो सॅव्ही’ झाले आहेत. टपाल वाटपासाठी सायकलवरून फिरणार्‍या पोस्टमन काकांचा प्रवास काळाच्या ओघात इलेक्ट्रिक वाहनापर्यंत पोहोचला आहे. बदलत्या काळात टपाल कार्यालयांच्या कामकाजात बदल होत गेले. कार्यालयात इंटरनेटचा वापर वाढला आहे. याशिवाय स्मार्ट मोबईलच्या वापरामुळे टपाल विभागात सकारात्मक परिणाम झाला आहे.

यातूनच ‘ई-पोस्ट’ ही संकल्पना यशस्वी झाली आहे. पोस्टाच्या वतीने डोअर सर्व्हिस देण्यात येत असून त्यामध्ये विमा, पेन्शन, आधारकार्डमधील बदल, बँकिग सेवा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर टपाल कार्यालाने एटीएम, फिलाटेली, ग्रामीण भागातील टपाल विभागात दर्पण सेवा, पासपोर्ट, स्पीड पोस्ट, आधुनिक पार्सल, डाक घर निर्यात केंद्र, पोस्टमन मोबाईल अ‍ॅप्लिकेशन, पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून अगदी सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यात येत आहे. परदेशी लॉजेस्टिक यासह विविध योजना यशस्वी झालेल्या आहेत.

टपाल कार्यालात व्यावसायिक पत्रव्यवहार वाढला

एकीकडे ‘ई-मेल’, ‘व्हॉटस्अ‍ॅप’च्या माध्यमातून येणारे मॅसेज यामुळे वैयक्तिक स्वरूपाच्या पत्रव्यवहारावर मर्यादा आल्या असल्या तरी व्यावसायिक स्वरूपाचा पत्रव्यवहार मात्र वाढला आहे. त्यामुळे टपाल विभागाचे काम आणखीनच वाढले आहे. त्यानुसार स्पीड पोस्टला प्रतिसाद वाढला आहे. ट्रॅकिंग सिस्टीम केल्याने पत्राची स्थिती, कुरिअर कोठपर्यंत गेले आहे. हे ऑनलाईन पाहण्याची सुविधा नागरिकांना दिसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढता आहे.

हेही वाचा

October Hit : राज्यात पुढील 10 दिवस ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा

Operation Ajay: इस्रायलहून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत पोहोचले

साखर उत्पादनापुढील समस्या!

Back to top button