Operation Ajay: इस्रायलहून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत पोहोचले | पुढारी

Operation Ajay: इस्रायलहून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत पोहोचले

पुढारी ऑनलाईन ; 212 भारतीय नागरिकांना घेऊन इस्रायलहून पहिले विमान भारतात पोहोचले आहे. इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन अजय Operation Ajay सुरू केले आहे, ज्या अंतर्गत भारतीय नागरिकांना इस्रायलमधून भारतात आणले जात आहे.

हमास सोबतच्या युध्दा दरम्‍यान इस्‍त्रायलच्या वेगवेगळ्या शहरात अडकून पडलेल्‍या भारतीय नागरिकांना तेथून बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. या ऑपरेशन दरम्‍यान २१२ भारतीयांना घेवून बेन गुरियन विमानतळावरून पहिले विमान दिल्‍लीत पोहोचले.

इस्रायलच्या वेळेनुसार भारतीय नागरिकांनी भरलेल्या या विमानाने बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता उड्डाण केले. या उड्डाणात 212 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान शुक्रवारी सकाळी 6 वाजता (भारतीय वेळेनुसार) दिल्लीला पोहोचले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धानंतर इस्रायलमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. खरं तर, 7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर, एअर इंडियाने इस्रायलमधून आपली सर्व उड्डाणे तात्काळ बंद केली होती. ज्यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकले होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार इस्रायलमधून ज्या लोकांना आणत आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले जात नाही. इस्रायलमध्ये सुमारे 18 हजार भारतीय वंशाचे लोक राहतात.

हेही वाचा :  

Back to top button