October Hit : राज्यात पुढील 10 दिवस ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा | पुढारी

October Hit : राज्यात पुढील 10 दिवस ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बहुतेक भागाला ‘ऑक्टोबर हिट’ने भाजून काढले असून पुढील दहा दिवस या झळा आणखी तीव्र होतील. त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारी विदर्भातील अकोला शहराचे तापमान 37.1 अंशावर गेले होते. वाढलेल्या तापमानामुळे विदर्भातील पारा 35 ते 37 अंशावर गेला असून कोकण व मध्य महाराष्ट्रात त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. तापमानात झपाट्याने वाढ होत असून असह्य उकाडा आणि उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाली आहे.

त्यामुळे सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या झळा उन्हाळ्याइतक्याच असह्य असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातून मान्सून आता दक्षिण भारतात गेला आहे. तो केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागात गेल्याने तेथे हलका पाऊस सुरू झाला आहे. बाकी देशात कुठेही पाऊस नाही. मात्र, तापमानाचा पारा देशभर 35 ते 37 अंशावर गेल्याने बाष्पीभवन वाढले आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात सक्रिय झाला आहे. दक्षिण व उत्तर भारतातील स्थितीमुळे कोकणात 13 ते 16 आणि मध्य महाराष्ट्रात 14 व 15 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा

Operation Ajay: इस्रायलहून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत पोहोचले

प्रश्न प्राथमिक आरोग्यसेवेचा!

साखर उत्पादनापुढील समस्या!

Back to top button