Hamas is worse than ISIS: ‘हमास’ ISIS पेक्षाही ‘महाघातक’ दहशतवादी संघटना | पुढारी

Hamas is worse than ISIS: 'हमास' ISIS पेक्षाही 'महाघातक' दहशतवादी संघटना

पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायलने हमास दहशतवादी संघटनेबद्दल मोठे विधान केले आहे. इस्रायल संरक्षण दलाने हमास ISIS पेक्षाही महाघातक दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील ट्विट इस्रायल संरक्षण दलाने त्यांच्या ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केले आहे. (Hamas is worse than ISIS)

इस्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे की, हमास ही नरसंहार करणारी इसिसपेक्षाही महाघातक दहशतवादी संघटना आहे. दरम्यान इस्रायलवर हल्ला करताना हमास दहशतवाद्यांनी सोबत SIS चे झेंडे आणले होते. इस्रायली मुले, स्त्रिया आणि पुरुषांची हत्या करताना हमासने ISIS चे झेंडे हातात घेतले असल्याचे देखील इस्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे. (Hamas is worse than ISIS)

हमासने शनिवारी (दि.७) इस्रायवर हवाई रॉकेट हल्ले केले. यामध्ये आत्तापर्यंत ३ हजार इस्रायली लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो नागरिक जखमी झालेत. दरम्यान हमास कडून गाझा पट्टीत हल्ले सुरूच असून, इस्रायलकडून देखील या हल्ल्यांना आता जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यामध्ये अनेक हमास दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे देखील इस्रायल संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Hamas is worse than ISIS)

हेही वाचा:

 

Back to top button