नांदेड : नायगाव तालुक्यात लालवंडी येथे महाप्रसादातून १०० हुन अधिक भक्तांना विषबाधा

Nanded News
Nanded News
Published on
Updated on

नायगाव; बाळासाहेब पांडे : लालवंडी (ता. नायगाव) येथे शेतातील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या अंबिली व महाप्रसाद भंडारा कार्यक्रमात सुमारे १०० हुन अधिक भक्तांना विषबाधा झाली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. विषबाधा झालेल्या रूग्णांवर ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • लालवंडी येथे १०० हुन अधिक भक्तांना महाप्रसादातून विषबाधा झाली आहे.
  • रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 
  • काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
  • नांदेड येथून उपचारासाठी वैद्यकीय पथक बोलवण्यात आले आहे.

लालवंडी गावामध्ये बुधवारी सायंकाळी एका शेतकऱ्याच्या शेतातील महादेव मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसादामध्ये भात, वरण आणि शेतकऱ्याच्या घरातून आणलेली आंबील एकत्र करून वाढण्यात आली. त्यानंतर जेवण केलेल्या भक्तांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. सुरूवातीला १८ जणांना त्रास होत असल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रूग्णांची संख्या वाढू लागली. याबाबतची माहिती नायगाव ठाण्याचे पो. नि. मारोती मुंढे यांना समजताच त्यांनी रुग्णालयाला भेट दिली.

नांदेड येथून उपचारासाठी वैद्यकीय पथक

दरम्यान, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेऊन प्राथमिक उपचारासाठी लालवंडी गावात मांजरम प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीम दाखल झाली आहे. अंगणवाडी येथे काही जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णाची संख्या वाढतच असल्याने नांदेड येथूनही उपचारासाठी वैद्यकीय पथक बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

प्रा. रवींद्र चव्हाण यांची रूग्णालयाला भेट

घटनेची माहिती कळताच ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रवींद्र पाटील चव्हाण व धनंजय पाटील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते गजानन चव्हाण, उपसरपंच, सरपंच, चेअरमन यांनी रुग्णांची भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करून उपचारासंदर्भात माहिती घेतली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news