Israel-Hamas War : इस्रायल ही सुरूवात, आता जगभर हल्ले : ‘हमास’चा कमांडर बरगळला
पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलवरील भीषणा हल्ल्यानंतर हमास दहशतवादी संघटनेच्या कमांडरने आता जगाला धमकी दिली आहे. हमास कमांडर महमूद अल-झहर याचा एक व्हिडिओ समाेर आला आहे. इस्रायल ही फक्त सुरुवात असून, आता जगभरात विविध ठिकाणी हल्ले होतील, अशी त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. आमचा कायदा जगभर लागू होईल, असा धक्कादायक दावाही त्याने केला आहे. (Israel-Hamas War)
Israel-Hamas War: हमास कमांडरची जगाला धमकी
हमासने शनिवारी (७ ऑक्टोबर) इस्रायलवर हवाई हल्ले केले. ज्यात आतार्यंत ३ हजारांहून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची हमास दहशतवादी संघटनेकडून जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यानंतर हमासचा कमांडर महमूद अल जहर याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत, संपूर्ण जगाला धमकी दिली आहे.
पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला उद्ध्वस्त करण्याचा इशारा
हमास कमांडरच्या या व्हारयल व्हिडिओनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी दहशतवादी संघटनेला इशारा देत, हमास संघटनेच्या प्रत्येक सदस्याचा मृत्यू निश्चित असल्याचे म्हटले आहे. हमास ही इसिसची दहशतवादी संघटना आहे आणि आम्ही तिचा नाश करू. जगाने जसे या संघटनेचा नाश केला. तसेच आम्ही देखील या संघटनेला नष्ट करू,असे पंतप्रधान नेतन्याहू यांनी एका निवेदनातून स्पष्ट केले आहे.
हमासच्या हल्ल्याला इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवरील भयंकर रॉकेट केला. हजारो लोक ठार झाले आहेत. हमास दहशतवाद्यांनी शेकडो इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि येथील विरोधी पक्षांनी संयुक्तपणे हमासच्या विरोधात 'राष्ट्रीय आणीबाणीचे सरकार' स्थापन केले आहे. या अंतर्गत हमास संघटनेने केलेल्या हल्याला इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
हेही वाचा :

