Canada Embassy Officer : कॅनडावर भारताची आता कठोर कारवाई | पुढारी

Canada Embassy Officer : कॅनडावर भारताची आता कठोर कारवाई

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताने कॅनडाला आपल्या (कॅनडाच्या) दिल्लीतील दूतावासातील 41 अधिकार्‍यांना (Canada Embassy Officer) परत बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केल्याने तसेच खलिस्तानी दहशतवादाला कॅनडा आपल्या भूमीत खतपाणी घालत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत सोडण्यासाठी अधिकार्‍यांना 10 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदतीनंतरही भारत सोडला नाही, तर अशा अधिकार्‍यांना मिळणार्‍या सवलती आणि इतर फायदे बंद केले जातील. कॅनडाचे सुमारे 62 मुत्सद्दी भारतात सध्या आहेत. 10 ऑक्टोबरनंतर केवळ 21 मुत्सद्दी देशात राहतील. (Canada Embassy Officer)

याआधीही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांच्या परस्परांकडील राजनयिकांची संख्या समान करण्यास सांगितले होते. व्हिएन्ना करारानुसार तसे आवश्यकही आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर एका भारतीय मुत्सद्यालाही देशाबाहेर काढले होते. कॅनडाच्या या कारवाईला प्रत्युत्तर देताना भारतानेही कॅनडाच्या एका राजनयिकाला देश सोडण्यास सांगितले होते. नंतर भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठीची व्हिसा सेवाही बंद केली.

हेही वाचा…

Back to top button