कॅनडा हा देश युक्रेनच्‍या ‘नाझीं’साठी ‘सुरक्षित आश्रयस्थान’ : रशियाचे राजदूत अलीपोव्‍ह | पुढारी

कॅनडा हा देश युक्रेनच्‍या 'नाझीं'साठी 'सुरक्षित आश्रयस्थान' : रशियाचे राजदूत अलीपोव्‍ह

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कॅनडाच्या संसदेत माजी नाझी सैनिकाचा सन्मान करण्याच्या कृती घृणास्पद होती. अज्ञानाबद्दल माफी मागणे पूर्णपणे हास्यास्पद आहे. कॅनडाला युक्रेनियन नाझींसाठी “सुरक्षित आश्रयस्थान” आहे, असे भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी ( Russian envoy Denis Alipov ) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ( पूर्वीचे ट्विटर ) वरील पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे.

आपल्‍या पोस्‍टमध्‍ये अलीपोव्‍ह यांनी म्‍हटले आहे की, कॅनडा हा देश युक्रेनियन नाझींसाठी आणि केवळ त्यांच्यासाठीच सुरक्षित स्वर्ग आहे आणि राहील. अज्ञानाबद्दल माफी मागणे हास्यास्पद आहे. त्‍यांनी एका माजी नाझी सैनिकाला संसदेमध्‍ये उभे राहून अभिवादन करणे ही कृती सर्व काही सांगते.”

कॅनडाच्‍या संसदेत काय घडलं?

युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की यांनी २२ सप्‍टेंबर रोजी कॅनडा दौर्‍यावर होते. त्‍यांनी कॅनडाच्‍या संसदेला संबोधित केले.यावेळी सभागृहाच्‍या गॅलरीत उपस्‍थित असलेल्‍या जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्‍या नाझी सैन्‍यातील माजी सैनिक ९८ वर्षीय यारोस्लाव हुंका यांच्याकडे स्पीकर अँथनी रोटा यांनी लक्ष वेधले. तेव्हा उपस्‍थित खासदारांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. यावेळी स्‍पीकर रोटा यांनी हुंका यांचे वर्णन ‘फर्स्ट युक्रेनियन डिव्हिजन’साठी लढणारा युद्धनायक म्हणून केला. त्‍याच्‍या याकृतीवर जोरदार टीका झाली. या संपूर्ण घटनेनंतर कॅनडातील ज्यू संघटनांनी रविवारी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.

पंतप्रधान  ट्रूडो यांनी माफी मागावी : कॅनडाचे विरोधी पक्षनेते पियरे पॉलीव्‍हेरे

कॅनडाच्या संसदेने हिटलरच्‍या नाझी सैन्यात सेवा केलेल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ज्यू आणि इतरांच्या सामूहिक हत्येसाठी दोषी ठरलेल्या एका युक्रेनियन व्‍यक्‍तीला उभे राहून अभिवादन केले. ही कृती अत्‍यंत चुकीची आहे, असा आक्षेप घेतया प्रकरणी ट्रूडो यांनी तत्‍काळ माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते पियरे पॉलीव्‍हेरे यांनी केली आहे. दरम्‍यान, हाऊस ऑफ कॉमन्सचे स्पीकर अँथनी रोटा यांनी म्‍हटले आहे की, ” या व्यक्तीबद्दल आपल्याला फारशी माहिती नव्हती. मला अधिक माहिती मिळाल्यामुळे माझ्या निर्णयाबद्दल पश्चाताप झाला, मी ज्यू समुदायांची आणि देशातील ज्यूंची माफी मागतो.”

हेही वाचा : 

 

Back to top button