Sherlyn Chopra : शर्लिनचा २ वर्षापूर्वीच पुनर्जन्म; ‘या’ कारणामुळे ट्रोल | पुढारी

Sherlyn Chopra : शर्लिनचा २ वर्षापूर्वीच पुनर्जन्म; 'या' कारणामुळे ट्रोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा ( Sherlyn Chopra ) तिच्या वैयक्तिक जीवनात खुलेपणाने मत मांडताना दिसत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी शर्लिनने बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे आणि राखी सावंत याच्यासोबतच्या व्यक्तव्यामुळे चर्चेत आली होती. आता तिच्या आणखी एका व्हिडिओने सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली आहे. यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ( Sherlyn Chopra ) एक व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शर्लिनला तिच्या २ वर्षापूर्वीच्या प्रकृतीबद्दल ( किडनी निकामी ) माहिती सांगताना दिसतेय. यात तिने म्हटलं आहे की, २०२१ मध्ये माझी किडनी निकामी झाली होती. डॉ. शरद सिंग (एचओडी, विभागप्रमुख) यांनी कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार केले. मी अॅडमिट झाले तेव्हा डॉक्टरांनी फक्त मला ३ महिन्यांची मुदत दिली होती. परंतु, काही दिवसानंतर मी माझ्या नशिबाने या आजारावर ( किडनी निकामी) केली. आणि यादरम्यान माझा पुनर्जन्म झाला होता.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तिची मैत्रीण राखी सावंतनेसोबत अनेक युजर्सनी आपआपली प्रतिक्रिया दिली आहे. यात काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ‘शर्लिन खोटे बोलत आहे. iPhone साठी किडनी काढून विकली काय?, ‘म्हणूनच म्हटलं की, प्लास्टिकची किडनी वापरू नका, ‘पुनर्जन्म होऊनही तुम्ही चांगले वागत नाही.’ असे नेकऱ्यांनी म्हटलं आहे. या व्हिडिओला साडेपाच लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

( video : viralbhayani instagram वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button