Sherlyn Chopra : शर्लिनचा साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप

sherlyn chopra
sherlyn chopra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माता साजिद खानच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. #MeToo मोहिमेदरम्यान, साजिद खानवर अनेक गंभीर आरोप लागले आहेत. त्यानंतर आता तो बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दिसल्याने अनेक अभिनेत्रींनी आक्षेप घेतला. यामध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्राचे नावदेखील आहे. शर्लिनने (Sherlyn Chopra) साजिदवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. आता शर्लिनने साजिद खान विरोधात मुंबई पोलिसमध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केलीय. (Sherlyn Chopra)

अभिनेत्री शर्लिनने चित्रपट निर्माते साजिद खानवर लैंगिक शोषण आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तिने साजिद खानविरोधात मुंबई पोलिसात तक्रारदेखील दाखल केलीय. इतकचं नाही तर शर्लिनने साजिद खान तुरुंगात हवा, अशी इच्छादेखील व्यक्त केली.
अभिनेत्री शर्लिन म्हणाली, "मी #MeToo आरोपी साजिद खानविरोधात लैंगिक शोषण, जबरदस्ती आणि धमकी प्रकरणी तक्रार दाखल केलीय. जेव्हा मी तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली, तेव्हा पोलिसांनी मला सर्वात आधी हे विचारलं की, ही घटना कधी झाली होती. यावर मी उत्तर दिलं की, हे २००५ मध्ये झालं. त्यांनी मला विचारलं की, तक्रार करण्यात इतका वेळ का लागला? मी म्हणाले की, तेव्हा माझ्यात साजिद खान सारख्या मोठ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्याची हिंमत नव्हती.

शर्लिन पुढे म्हणाली, "२०१८ मध्ये सुरू झालेल्या मीटू आंदोलनादरम्यान जेव्हा मी महिलांना पुढे येऊन अत्याचारांबाबत बोलताना पाहिले , तेव्हा मला हिंमत मिळाली. साजिद खानने केवळ माझ्यासोबतच नाही तर अनेक महिलांसोबत असं केलं. आपण सोशल मीडियावर जाऊन पाहू शकता की, साजिद खानने त्या महिलांसोबत कशाप्रकारे अयोग्य व्यवहार केला आहे.

शर्लिन पुढे म्हणते, एखादी महिला घटनेच्या अनेक वर्षांनंतर आपलं दु:ख शेअर नाही करू शकत? पण, ती करू शकते. तेव्हा माझ्याकडे हिंमत नव्हती. पण, आज आहे. आज मला वाटतं की, साजिद खान असो वा राज कुंद्रा यांनी जर चुकीचं केलं असेल तर मी त्यांच्याविरोधातही आवाज उठवू शकते."

शर्लिनने साजिद खान विरोधात पुराव्यांबद्दल बोलताना सांगितले की, "तेव्हा माझ्याकडे कोणते पुरावे नव्हते. कारण, एक दिग्दर्शक किंवा निर्मात्यासोबत एका प्रोफेशन मिटींगदरम्यान मी कोणत्याही प्रकारचा गुप्त कॅमेरा ठेवला नव्हता. जर पोलिसांनी मला पुराव्यासंबंधी विचारले असते, तेव्हा मी काय म्हणाले असते? तो फराह खानचा भाऊ आहे आणि शाहरुख खान-सलमान खानचा जवळचा आहे. मी त्याच्यासमोर काय आहे? मी केवळ एक बाहेरची व्यक्ती होते बाकी कुणीच नाही. मी कशाप्रकारे सत्य सिध्द केले असते?"

"मी माझे मित्र आणि जवळच्या व्यक्तींना याबद्दल सांगितले होते. पण, माझ्या परिवाराला नाही. कारण मी विचार केला होता की, ते माझ्याबद्दल काय विचार करतील. माझ्या वडिलांचा त्यावेळी मृत्यू जाला होता. माझे कुटुंबीय खूप चिंतेत होते".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news