UK Prime Minister Post Race : ऋषी सुनक यांच्यावर पंतप्रधानपदाच्या शयर्तीतून बाहेर पडण्यासाठी टाकला जोतोय दबाव | पुढारी

UK Prime Minister Post Race : ऋषी सुनक यांच्यावर पंतप्रधानपदाच्या शयर्तीतून बाहेर पडण्यासाठी टाकला जोतोय दबाव

लंडन; पुढारी ऑनलाईन : ब्रिटनच्या पुढील पंतप्रधान पदाच्या शयर्तीमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे सर्वात पुढे आहेत. पण, पक्ष वाचविण्यासाठी या शयर्तीतून बाहेर पडण्याचा दबाब त्यांच्याच पक्षातील मोठ्या नेत्याकडून टाकला जात असल्याची माहिती ब्रिटनच्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेतृत्व करण्याच्या स्पर्धेत ऋषी सुनक यांना पछाडत लिझ ट्रस यांनी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेतली आणि त्या पंतप्रधान बनल्या होत्या. पण, अवघ्या ४५ दिवसांत त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता ऋषी सुनक हे प्रधानमंत्री बनण्याच्या शयर्तीमधील सर्वात आघाडीचे नाव आहे. (UK Prime Minister Post Race)

ऋषी सुनक आता स्वाभाविकपणे लिझ ट्रस यांच्या नंतरचे पक्ष नेतृत्वातील मोठे नाव आहे. पर्यायाने ते प्रधानमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहेत. पण, कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला २०२४ पुन्हा एकदा निवडूण आणण्यासाठी प्रधानमंत्री पदाच्या शयर्तीतून बाहेर पडण्याचा दबाव टाकण्यात येत आहे. या पक्षातील वरीष्ठ नेत्यांना ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली पुढील २०२४ सार्वत्रीक निवडणुकीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला यश मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत सुनक यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव वाढत आहे. (UK Prime Minister Post Race)

याबाबत पक्षाचे वरीष्ठ नेते व माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कॉन्झर्वेटिव्ह पक्षातील खासदारांपुढे हा मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच ते पक्षातील खासदारांना पटवून देत आहेत की, केवळ तेच डिसेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पक्षाला निवडून देऊ शकतात. याबाबत लंडनच्या टेलीग्राफ वृत्तपत्राने माहिती दिली आहे. (UK Prime Minister Post Race)

संसदेत प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या घटत्या लोकप्रियतेचा हवाला देत विरोधी पक्ष मध्यावधी निवडणुकांची मागणी करत आहेत. बोरिस जॉन्सन ऋषी सुनकवर प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव आणत आहेत. पुढील आठवड्यात पक्षनेतृत्वाची निवडणूक होत असून, त्यावर शुक्रवारपर्यंत निर्णय अपेक्षित आहे.

ऋषी सुनक आणि बोरिस जॉन्सन यांच्या व्यतिरिक्त, हाऊस ऑफ कॉमन्सचे नेते, पेनी मॉर्डाउंट, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button