Rakhi Sawant : राखी सावंतला मुंबई पोलिसांकडून अटक, शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर मोठा झटका | पुढारी

Rakhi Sawant : राखी सावंतला मुंबई पोलिसांकडून अटक, शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर मोठा झटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : ड्रामा क्वीन राखी सावंतला शर्लिन चोप्रा प्रकरणात अटक करण्यात आलीय. शर्लिनने ट्विट करून राखीबद्दल ही माहिती शेअर केली आहे. शर्लिनने राखी सावंत विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता अंबोली पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत राखीला अटक केलीय. असे ट्विट स्वत: शर्लिन चोप्राने केले आहे. तिला आज कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.

शर्लिनने FIR ची कॉपी सोशल मीडियावर केली होती शेअर

राखीने ६ नोव्हेंबर रोजी शर्लिन चोप्रा विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शर्लिनने देखील एक पाऊल पुढे टाकत राखीविरोधात पोलिसात केस फाईल केली होती. शर्लिनने FIR ची कॉफीदेखील सोशल मीडियावर शेअर केलीय. तिने लिहिलंय-‘नौटंकीबाज राखी सावंत तयार हो अटक होण्यासाठी.’

काय आहे प्रकरण?

बिग बॉस 16 सुरू झाल्यानंतर शर्लिनने निर्मात्यांवर साजिद खानच्या एन्ट्रीवरून नाराजी व्यक्त केली होती. शर्लिनचं म्हणणं होतं की, ज्या व्यक्तीने अनेक तरुणींचे शोषण केलं आहे, त्याला शोमध्ये राहण्याचाकुठलाही हक्क नाही. यानंतर शर्लिन ही साजिद खान विरोधात तक्रार घेऊन पोलिसांकडे गेली होती.

राखी आज तिचा पती आदिल खान दुर्रानी सोबत दुपारी ३ वाजता आपली डान्स ॲकॅडमी लॉन्च करायची होती.

Back to top button