( ICC T20 World Cup )अफगाणिस्तान करेल का न्यूझीलंडची शिकार? भारतीयांचे सामन्‍याकडे लक्ष | पुढारी

( ICC T20 World Cup )अफगाणिस्तान करेल का न्यूझीलंडची शिकार? भारतीयांचे सामन्‍याकडे लक्ष

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सर्व भारतीयांचे लक्ष रविवारी (दि. ७) होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्याकडे लागले आहेत. ( ICC T20 World Cup ) टी २० वर्ल्डकप ग्रुप २ मधील या दोन संघात हा सामना रंगणार आहे. भारताने शनिवारी स्कॉटलंड विरुद्ध मोठा विजय नोंदवला आहे. शिवाय या विजयासह त्यांनी आपला रनरेट अफगाणिस्तानपेक्षाही सरस केला आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यात अफगाणिस्तानने  न्यूझीलंडला मात दिली. तर भारतीय संघाचा सेमिफायनलचा मार्ग सुकर हाेणार आहे.

टी २० वर्ल्डकपमध्ये ( ICC T20 World Cup ) न्यूझीलंडने पाकिस्तान वगळता अन्य संघासोबत चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले. तर न्यूझीलंडने भारत, स्कॉटलंड आणि नामिबियाला पराभूत केले आहे. न्यूझीलंड ६ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्यास्थानी आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंड आणि नामिबियाला पराभूत केले आहे. तसेच या संघाने पाकिस्तानला कडवी लढत दिली होती. अफगानिस्तानकडे चांगली फलंदाजी आहे. तसेच त्यांच्या संघात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे ते न्यूझीलंडला कडवी टक्कर देतील, असे मानले जात आहे.

 ICC T20 World Cup : न्यूझीलंड संघ फिरकी समोर करतोय संघर्ष

यंदाच्‍या टी २० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा संघ चांगली कामगिरी करत आहे; पण, तो फिरकी गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचे फिरकीपटू राशिद खान आणि मुजीब उर रहमान हे न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. न्यूझीलंडकडे कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टीन गप्टील हे दोन अनुभवी फलंदाज आहे. ते फिरकी गोलंदाजी चांगली खेळतात. या दोघांना अफगानिस्ताने लवकर बाद केले तर अफगानिस्तान न्यूझीलंडवर वर्चस्व निर्माण करु शकते.फक्त मजीब उर रहमान हा पूर्णपणे तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. जर हे दोन फिरकी गोलंदाजांनी लय पकडली तर न्यूझीलंडच्या फलंदाजांना हा सामना अडचणी आणू शकतो, असेही  शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

दुसरीकडे अफगाणिस्तानच्‍या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या फिरकीपटूंपासून सावध राहिले पाहिजे. सँटनर आणि इश सोधी यांनी सर्व सामन्यात चांगली गोलंदाजी करत महत्त्वाचे फलंदाज बाद केले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी भारताला मोठ्या अडचणी आणल होतं व यामुळे भारताला सामना गमवावा लागला होता. त्यामुळे अफगाणिस्तानला देखील न्यूझीलंडच्या फिरकीपासून सावध राहणे गरजेचे आहे.

फिरकीपटूच गाजवतील सामना

हा सामना अबुधाबी येथील शेख जायेद स्टेडियमवर रविवारी दुपारी खेळवला जाणार आहे. यावेळी खेळपट्टी कोरडी असणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व राहू शकते. त्यामुळे तमाम भारतीयांची हिच इच्छा आहे की अफगानिस्ताने न्यूझीलंडला पराभूत करावे.

मुजीबने स्कॉटलंड विरुद्ध घेतले होते ५ बळी

यंदाच्‍या टी २० वर्ल्डकपमध्ये राशिद खान याने ७ बळी तर मुजीबने एकूण ६ बळी घेतले आहेत. स्कॉटलंड विरुद्ध मुजीबने ४ षटकांमध्ये २० धावा देत ५ बळी घेतले होते. टी२० वर्ल्ड कपमध्ये पदार्पणातच ५ बळी घेणारा मुजीब हा एकमेव गोलंदाज ठरला आहे.

काय आहेत समीकरणे? 

भारतीय संघाला आपला रनरेट अफगाणिस्तानपेक्षा चांगला करण्यासाठी स्कॉटलंड विरुद्धचा सामना ७.१ षटकांच्या आत जिंकणे अनिवार्य होतं. भारतीय संघाने हा सामना ६.३ षटकात जिंकला. आता भारतीय संघाला नामिबिया विरुद्धचा सामना जिंकायचा आहे. जर असे झाले तर भारताचे ६ गुण होतील. रविवारी होणाऱ्या अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंडचया सामन्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले तर अफगाणिस्तानसुद्धा ६ गुण प्राप्त करेल; पण, भारताचा रनरेट चांगला असल्यामुळे भारत हा सेमीफायनलमध्ये पोहचू शकेल. आता आज (दि.७) हाेणारा सामना अफगाणिस्तान जिंकेल का ? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. या सामन्‍याकडे भारतीयांचे लक्ष वेधले आहे.

Back to top button