Apple Event 2023 : ॲपलच्या इव्हेंटमधील पीव्ही सिंधूचे फोटो व्हायरल; आयफोन १५ सीरीजचा लॉन्चिग सोहळ्याचा घेतला आनंद | पुढारी

Apple Event 2023 : ॲपलच्या इव्हेंटमधील पीव्ही सिंधूचे फोटो व्हायरल; आयफोन १५ सीरीजचा लॉन्चिग सोहळ्याचा घेतला आनंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : Apple Event 2023 चा आयफोनसह वॉच लॉन्चिंग इव्हेंट मंगळवारी पार पडला. जगभरातून अनेकजण हा सोहळा इंटरनेटच्या माध्यमातून लाईव्ह पाहात होते. काही दिग्गज मंडळींनी या इव्हेंट प्रत्यक्षदर्शी उपस्थिती दर्शविली. भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू या लॉन्चिग सोहळ्याला उपस्थित होती. तिचा या इव्हेंटमधील एक फोटो व्हायरल होत आहे.

एका वृत्त समुहाने पी. सिंधूचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो अॅपल इव्हेंट 2023 दरम्यानचा आहे. कॅलिफोर्नियातील Apple मुख्यालयाच्या ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’मध्ये हा इव्हेंट पार पडला.  या सोहळ्याला अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. पी. व्ही. सिंधू देखील या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने भारतीय चाहत्यांमध्ये आयफोनसह पी व्ही सिंधू ट्रेंडिंगवर आली आहे .

जगभरातून अॅपलचे चाहते आयफोनच्या नव्या सीरीजच्या लॉन्चिगची प्रतिक्षा करत होते. अॅपलच्या वल्डरलस्ट या इव्हेंटनंतर आता आयफोन १५ सीरीज चाहत्यांसाठी उपलब्ध झालेली आहे. विशेष म्हणजे या आयफोनच्या या सीरीजपैकी काही मॉडेल भारतात असेम्बल केले जाणार आहेत. त्यामुळे आता या नव्या सीरीजच्या भारतीय बाजारपेठेतील मॉडलची आयफोन चाहतावर्ग अतुरता वाट पाहत आहे.

हेही वाचा

Back to top button